जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डीत निष्क्रिय खासदारांचा पराभव निश्चित -माजी खा.वाकचौरे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीनंतर मीच खासदार असणार नाही तर प्रत्येक जण खासदार असणार आहे.दहा वर्षे निष्क्रिय खासदार असल्याने त्यांचा पराभव निश्चित असल्याचे प्रतिपादन महाघाडीचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव प्रचार कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला त्यावेळी उपस्थित नेते आणि कार्यकर्ते.

सदर प्रसंगी बहुजन भीम पँथर सेनेचे संस्थापक इब्राहिम मुन्नाभाई शेख यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.व आपण सक्रिय राहणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार व माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा नारळ विघ्नेश्वर मंदिरात व कोपरगाव प्रचार कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.


  सदर प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,सेनेचे संपर्क प्रमुख जगदीप चौधरी,सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, शहर प्रमुख सनी वाघ,भरत मोरे,माजी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,रंजन जाधव,माजी नगरसेवक सपना मोरे,माजी तालुकध्यक्ष शिवाजी ठाकरे,मुकुंद सिंनगर,माजी तालुकाध्यक्ष श्रीरंग चांदगुडे,डॉ.अजेय गर्जे,आदी मान्यवारांसह शिवसैनिक,काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार व इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांच्या कार्यालयात माजी खा.व उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा हार घालून सत्कार करण्यात आला आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक आठवड्यात दोनदा शिर्डीत यावे लागले व आपल्या एका मंत्र्याला हॉटेलमध्ये बसून राहावे लागते यातच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाघाडीचे यश असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी आपले मशाल चिन्ह पोहचवावे असे आवाहन केले आहे.व वंचित आघाडी बाबत बोलताना ते म्हणाले की,”वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असून त्यांनी २७ जागा मागितल्या होत्या हे अशक्य असून ती मते वाया जाऊ नका असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमीन व्यवहाराचे बेजबाबदार वक्तव्य करावे ही बाब चुकीची असून आपण त्याबाबत न्यायालयात खटला चालू असताना वक्तव्य करावे हे दुर्दवी असल्याचे शेवटी म्हटले आहे.

सदर प्रसंगी संदीप वर्पे म्हणाले की,”सामाजिक संकेटस्थळावर चुकीच्या विचारांचे खंडन केले पाहिजे,रासायनिक खते,औषधे यावर जी.एस.टी.लावला जातो आणि बारा हजार रुपये देतो असे सांगून फसवणूक करतात.पायांच्या चपलापांसून डोक्याच्या केसांपासून जी.एस.टी.बसवला जात असून जनतेची लूट चालू आहे.आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दल जनतेत विश्वास आहे.आपलेपणाची भावना आहे.त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप चांगले वातावरण आहे.दरडोई उत्पन्नात भारतापेक्षा श्रीलंका पुढे असून १३३व्या क्रमांकावर असून  भारत १४३व्या क्रमांकावर असल्याचे सांगून भारताचा पाचव्या क्रमांकाचा बोभाटा करून मतदारांना वेड्यात काढण्याचे काम भाजपकडून जोरात सुरू असल्याचा आरोप वर्पे यांनी शेवटी केला आहे.

  सदर प्रसंगी संपर्क प्रमुख जगदीश चौधरी म्हणाले की,”राज्यात शिर्डी लोकसभा मतदार संघ सर्वाधिक सशक्त आहे.कोपरगाव,अकोले तालुक्यात खूप चांगली स्थिती आहे.त्यांनी मशाल या आपल्या चिन्हांच्या बाबत सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकर्त्याना ताकद द्यावी लागेल.

सदर प्रसंगी राजेंद्र झावरे म्हणाले की,”शिवसेनेसह सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान पानाची अपेक्षा न करता आपले उमेदवार माजी खा.वाकचौरे यांचे काम करा व उमेदवार विजयी करण्याचे काम करावे असे आवाहन केले आहे.

  सदर प्रसंगी शिवाजी ठाकरे यांनी शिर्डी मतदार संघात १५ लाख घरे दिल्याची खोटी जाहिरात दूरदर्शनवर दिली जात आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.निळवंडे प्रकल्पाच्या मान्यता माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कालवा कृती समितीस मिळवून दिल्या आहेत.सेनेचे मशाल हे पक्ष चीन्ह जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे

   यावेळी भरत मोरे म्हणाले की,”एक भाजप नेत्याने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक दहा लाखांचे निधी दिला त्यामुळे ही मंडळी गुपकचुप काम करणार असल्याचा गौप्यस्फोट आहे.

सदर प्रसंगी प्रमोद लबडे,शिवाजी ठाकरे,आकाश नागरे,अस्लम शेख,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.उपस्थितांचे आभार कलविंदर दडीयाल यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close