जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

श्री क्षेत्र पैठण दिंडीचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   श्री क्षेत्र भऊर ते शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे समाधीश्री क्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र पैठण दिंडीचे आयोजन स्थान असलेल्या श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी सालाबादप्रमाणे या वर्षी हि पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   

श्री क्षेत्र पैठण येथे संत एकनाथांची समाधी असून त्यांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडूरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे.पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे.याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहीले.मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात.त्यामुळे येथे यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

पैठण दक्षिण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे.छत्रपती‌ संभाजीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे.पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी,जायकवाडी धरण,ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.मात्र यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे संत एकनाथांची या ठिकाणी समाधी असून त्यांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडूरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे.पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे.याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहीले.मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात.अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे.त्यामुळे या ठिकानी देशभरातून भाविक या ठिकाणी तीर्थ यात्रेला येतात.दिंड्या तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात.यातील अलीकडील काळात येणारी दिंडी म्हणून संत नारायणगिरिजी महाराज यांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प.संजय महाराज जगताप यांची श्री क्षेत्र भऊर येथून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांसह येणारी दिंडी म्हणून प्रसिद्ध पावली आहे.

   सदर दिंडीचे आज सोमवार दि.२५ मार्च रोजी प्रस्थान झाले आहे.सदर दिंडीचा पहिला मुक्काम हा अमोल भागवत यांचे कडे राहणार आहे.तर त्या नंतर वडेकर नगर,नाराळा,पैठण पंचायत समिती शेजारी शेवटचा मुक्काम राहणार असल्याची माहिती त्यांनी देऊन या दिंडीत भावीकनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close