शैक्षणिक
शासकीय रेखाकला परीक्षेत राज्य गुणवत्ता यादी जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांनी घेतलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमिजिएट’ परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.या दोन्ही परीक्षेसाठी महाराष्ट्रातून आठ लाख विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.या विद्यार्थ्यापैकी शंभर विद्यार्थ्याची राज्य गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.या परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या कु.सिध्दी अविनाश येवलेकर या विद्यार्थीनी ने राज्य गुणवत्ता यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर विद्यार्थीनीला प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख पर्यवेक्षक कला शिक्षक मंगेश रहाणे,ज्ञानेश्वर पर्वत, अविनाश चैधरी,दिनेश बागुल,वैभव आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.