जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यात सरकारे अपयशी-आरोप

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   शेतकरी हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी केंद्रात कोणतेही सरकार आले तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग उपेक्षित राहत असून त्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यात सरकारे कमी पडत असून याबाबत तत्कालीन खा.सूर्यभान पा.वहाडणे सारखे वजनदार नेते न्याय देत असल्याचे प्रतिपादन वकिल संघाचे माजी अध्यक्ष अड्.मच्छीन्द्र खिलारी यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका आंदोलनात बोलताना केले आहे.

  

“देशातील शेतकऱ्यांनी एक दोन वर्षे केवळ आपल्या कुटूंबापूरते कृषी उत्पन्न पिकवले तर शेतकऱ्यांचे महत्व शहरातील नागरिक व सरकारला पटेल व ते शेतीमालाला योग्य दर देतील.वर्तमानात कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखाने तोडून नेत नाही त्यामुळे वजनात मोठी घट येत आहे”-प्रवीण शिंदे,संपर्क प्रमुख,शिवसेना.

दिल्ली नजीक हरियाणा-पंजाब सिमेवर शंभू येथे देशातील विविध संघटनांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन सुरू केले असून त्यात,”शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एम.एस.पी.) मिळण्यासाठी  कायदा करावा,डॉ.एम.एस.स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात.शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे,कृषी वस्तू,दुग्धजन्य पदार्थ,फळे,भाजीपाला व मांसाची आयात कमी करावी,आयात शुल्कात वाढ करावी,५८ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्तिवेतन योजना लागू करावी,दरमहा १० हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे यांसह विविध रास्त मागण्या शेतकऱ्यांनी केल्या असून त्यासाठी देशभरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत असून कोपरगाव तहसील प्रांगणात आज कोपरगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने,’सिफा’चे रघुनाथ दादा पाटील व प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय ‘लाक्षणिक उपोषण’आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.

    सदर प्रसंगी कोपरगाव तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,सचिव कैलास रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,अड्.दिलीप लासुरे,अड्.योगेश खालकर,कोपरगाव तालुका शेतकरी समितीचे तुषार विध्वंस,प्रवीण शिंदे,संतोष गंगवाल,रंगनाथ गव्हाणे,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,साहेबराव गव्हाणे,शिवाजी गायकवाड,गहिनीनाथ घुले,विजय जाधव,परबत गव्हाणे,दादासाहेब भागवत,अशोक भागवत,चंदनशिव,प्रल्हाद जवरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

“आगामी काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिला नाही तर या आंदोलनाच्या ठिणगीचे  रूपांतरण मोठया ज्वालेत होऊन त्याच्या झळा सरकारला बसू शकतात त्यामुळे या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे”-संतोष गंगवाल,जिल्हा उपाध्यक्ष,मनसे.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,””किमान आधारभूत किंमत (एम.एस.पी.) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा,डॉ.एम.एस.स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात.शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे,कृषी वस्तू,दुग्धजन्य पदार्थ,फळे,भाजीपाला व मांसाची आयात कमी करावी,आयात शुल्कात वाढ करावी,५८ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्तिवेतन योजना लागू करावी,दरमहा १० हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे या मागण्या वास्तवदर्शी असून त्यात शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.दहा वर्षात शेती मालाचे दर जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहे.अशा स्थितीत कोण शेतकरी फायद्यात करून शकेल.त्यासाठी सरकारने या आंदोलनात लक्ष देणे गरजेचे बनले आहे.त्यावेळी त्यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे शेती सिंचनाचे पाणी गेले व ब्लॉक गेले शेतकऱ्यांच्या सिलिंगच्या नावाखाली जमिनी गेल्या असून वर्तमान राजकीय नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.त्यामुळे तालुक्याचे वाटोळे झाले आहे.तालुक्याच्या पूर्व भागात त्यावेळी वजनदार नेते असल्याचे त्यांना मराठवाडा जलद कालव्यांचे पाणी मिळू शकले असल्याचा दावा केला आहे.पूर्वी तालुक्यात सहा साखर कारखाने होते आज कसेबसे दोन साखर कारखाने तग धरून उभे आहे.त्यांनाही बाहेरून ऊस आणावा लागत आहे. त्यातच इथेनॉल मुळेसाखर उताऱ्यावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे.त्यामुळे साखर उतारा घटून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.साखर कारखाण्याचे वजन काटे तपासण्याची गरज प्रतिपादन केली आहे.व शेतकरी प्रश्नासाठी आपण शेतकरी संघटनेबरोबर राही असा आश्वासन शेवटी दिले आहे.

   सदर प्रसंगी अड्.दिलीप लासुरे बोलताना म्हणाले की,”तालुक्यातील साखर कारखाने उसाला कमी दर देत असून आधी बाहेरील ऊस आणून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना गृहीत धरत आहे.काही दिवसापूर्वी नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या तालुक्यातील ईशान्य गडावरील नेत्यांनी ऊसास कमी भाव दिला होता.त्यावेळी त्यांनी कारखाना स्थळावर येऊन आंदोलन केले होते.त्यावेळी घाबरलेल्या साखर कारखानदारांनी त्यांना तातडीने घरपोच फरक दिला असल्याची आठवण करून दिली आहे.व संघर्ष केल्यावर नक्की यश मिळत असल्याचा मंत्र दिला आहे.व शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याची गरज प्रतिपादन केली असून आगामी निवडणुकांत विविध विचारधारेच्या कार्यकार्त्यानी एकत्र येऊन निवडणुका लढण्याची गरज प्रतिपादन केली आहे.

   सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे,कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस,प्रवीण शिंदे,कैलास गव्हाणे,संतोष गंगवाल,आप्पासाहेब कोल्हे आदींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक अड्.योगेश खालकर यांनी केले तर सूत्रसंचनल बाबासाहेब गव्हाणे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार शिवाजी गायकवाड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close