विविध पक्ष आणि संघटना
…या पक्षाचा होणार शेतकरी मेळावा
न्यूजसेवा
श्रीरामपूर -(प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व राज्याच्या दिव्यांग विभागाचे प्रमुख बच्चू कडू यांचे प्रमुखं उपस्थिती मध्ये सोमवार दि.२९जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान,श्रीरामपूर येथे शेतकरी,कामगार,पशुपालक व दूध उत्पादकाचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा नमूद करताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगीतले की,”बच्चु कडू यांच्या शुभ हस्ते हस्ते व महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम श्रीरामपूर नगर परिषदेच्या मिनी स्टेडियम जवळ महाराष्ट्रातील एकमेव अश्या दिव्यांग भवनाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमास खा.सदाशिव लोखंडे,आ.सत्यजित तांबे,आ.लहुजी कानडे,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपविभागीय अधिकारी किरण सावंत,मुख्याधिकारी गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांचे सह प्रहारचे सर्व जिल्हा पदाधिकारी त्याचबरोबर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ उपप्रमुख लक्ष्मण खडके,कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे व सर्व प्रहार तालुका कार्यकारिणी,तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शहर प्रमूख व पदाधिकारी जिल्हयातील सर्व तालुका प्रमूख व कार्यकारिणी आणखी तमाम प्रहार सैनिक व शेतकरी,दुध उत्पादक आणि कामगार बंधू उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रसंगी दिव्यांग मंत्रालय व श्रीरामपूर नगरपरिषद यांचे संयुक्त विद्यमाने या ‘दिव्यांग भवन’ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यानंतर बच्चु कडू आणि सर्व प्रहार सैनिक रॅलीने आझाद मैदान या ठिकाणी जाणारा असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी शेतकरी कामगार दुग्ध उत्पादक यांचा मेळावा होणार आहे.तरी शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी,कामगार,दिव्यांग,विद्यार्थी यांनी लाखोच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनीं शेवटी केले आहे.