आरोग्य
…या शहरात,’मोफत सर्व रोग निदान शिबिर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव आ.आशुतोष काळे व श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.२९ जानेवारी रोजी सकाळी ०९ ते दुपारी ०२ या वेळेत कोपरगाव शहरातील संजयनगर येथील समाजमंदिर या ठिकाणी,’मोफत सर्व रोग निदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सदर शिबिरात मेंदूच्या सर्व आजारांवर उपचार शस्रक्रिया,हाडांचे विकार,डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार,युरो सर्जरी,ह्रदयविकार संबंधित आजार,स्त्रियांच्या सर्व आजारांवर उपचार,दातांच्या विविध समस्या तसेच इतरही आजारांबाबत तपासणी केली जाणार आहे.
सदर शिबिरात विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या व आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावून उपचार घेवू न शकणाऱ्या गरजू रुग्णांसाठी आ.काळे व एस.जे.एस.हॉस्पिटलच्या वतीने विविध आजारांवर मोफत निदान करण्यात येणार आहे.यामध्ये मेंदूच्या सर्व आजारांवर उपचार शस्रक्रिया,हाडांचे विकार,डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार,युरो सर्जरी,ह्रदयविकार संबंधित आजार,स्त्रियांच्या सर्व आजारांवर उपचार,दातांच्या विविध समस्या तसेच इतरही आजारांबाबत तपासणी केली जाणार आहे.
या मोफत शिबिरामध्ये सर्व रुग्णांची अनुभवी व तज्ञ डॉक्टर तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल अशा रुग्णांची महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे.तरी सदर मोफत सर्व रोग निदान शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील गंगूले यांच्या वतीने करण्यात आले आहे.