जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या तालुक्यात मोठा दरोडा,अखेर गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत गावाच्या पूर्वेस साधारण दिड कि.मी.रहिवासी असलेले शेतकरी प्रशांत जनार्दन मोरे (वय-४९) हे आपल्या कुटुंबासह एका लग्नाला बाहेरगावी असताना त्यांच्या राहत्या वस्तीवर पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून घरातील विविध ठिकाणी ठेवलेले सोने व रोख रक्कम असा सुमारे ११ लाख रुपयांवर डल्ला मारला असल्याने कोपरगाव तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील शेतकरी प्रशांत मोरे यांची हि तीच वस्ती येथे चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखवली आहे.

दरम्यान या प्रकरणी आधी पोलीस अधिकांऱ्यानी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली असून या प्रकरणी श्रीरामपूर येथील एका नातेवाईकाने थेट महसूलमंत्री तर संवत्सर येथील नेत्याने अखेर शिर्डी येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास दूरध्वनी केल्याने या अधिकाऱ्याने एका कनिष्ठ अधिकाऱ्यांचे कान उपटल्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचे समजत आहे.

   सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले आहे.राजकीय नेते आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे.अनेक चोऱ्या होऊनही अद्याप या चोरट्यांचा तपास लागलेला नाही.रोज होणाऱ्या दुचाकी चोऱ्याची तर मोजदाद नाही.अशीच मोठी घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे व शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२६ मे च्या रात्री सहकारी सेवा सोसायटीच्या मालकीच्या ‘हिमगिरी’ या इमारतीत इंडियन ओव्हरसिज बँकेत घडली होती.त्यावेळी सदर ए.टी.एम.त्यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप या चारचाकीचा वापर करून एका वायर रोपच्या सहाय्याने सदर ए.टी.एम.ओढून बाहेर काढले व त्यास फरफट नेऊन गावाच्या पश्चिमेस साधारण तीन कि.मी.अंतरावर नेले असल्याची व तो प्रयत्न अपयशी होताच व त्या घटनेस सात महिने उलटत आले असताना त्यांच्या डोक्यातून या बँकेचे ए.टी.एम.बाहेर पडले असल्याचे दिसले नव्हते.त्यांनी त्यावर पुन्हा एकदा पाळत ठेऊन दि.१९ डिसेंबर २०२३ च्या पहाटे ३.४७ वाजता सदर बँकेच्या ए.टी.एम.गाळ्यात प्रवेशकरून तेथील ए.टी.एम.गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील रोख रक्कम रुपये १० लाख ८३ हजार ७०० रुपयांवर डल्ला मारला होता.त्यामुळे अपुरी असलेली आपली मोहीम पोलिसांच्या नाकावर टिच्चून पूर्ण केली होती.अद्याप सदर चोरट्यांचा शिर्डी पोलिसांना तपास लागलेला नसताना आता हे कमी की काय त्यांनीं तालुका पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीस कारणीभूत असलेल्या पुढाऱ्यांच्या नातेवाईकांच्या सांगवी भुसार येथील घरीच आपली,’हाथ की सफाई’ दाखवुन पोलिसांना आणि राजकीय नेत्यांना नववर्षाच्या प्रारंभीच राजरोस वाकुल्या दाखवुन सलामी दिली आहे.

घरातील कपाट आणि त्यातील वस्तू अस्ताव्यस्त करून त्यातील रोख रक्कम व सोने पळवून नेले आहे.

दरम्यान या दरोड्यातील ऐवज १८.५ तोळ्या ऐवजी हा केवळ ३.५ तोळे दाखविण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी दबाव बनवला असल्याचे माहिती हाती आली आहे.मात्र वरिष्ठ पातळीवरून फोनाफोनी झाल्याने मोठ्या प्रयत्नाने अखेर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे तालुक्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

   त्याचे झाले असे की.”फिर्यादी मोरे हे आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नास दि.०५ जानेवारी रोजी सकाळीच बाहेरगावी गेले होते.नेमकी चोरट्यांनी हि संधी साधत आपली मोहीम फत्ते केली आहे.त्यांनी त्या रात्री १२ वाजेनंतर व पहाटे या दरम्यान घराच्या समोरच्या बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता.व आतील शयन गृहातील कपाट,ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मधील १८ तोळे ०५ ग्राम सोने लंपास केले आहे.या शिवाय ५०० रुपये किमतीच्या नोटा असलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

प्रशांत मोरे यांच्या घरातील ड्रेसिंग टेबल मधील चीजवस्तू चोरट्यानी लांबवल्या आहेत.

दरम्यान या चोरीत सोन्याच्या दागिन्यांत २५ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र,१५ हजार किमतीची सोन्याची साखळी,२० हजार किमतीचे ०४ तोळे वजनाचे सोन्याचा गोट,१० हजार किमतीचे चार ०२ तोळे वजनाचे सोन्याचे नाणे,०३ हजार किमतीचे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ,०५ हजार किंमतीची दोन दोन तोळे वजनाची कानातील सोन्याचे टॉप्स,२.५ हजार किमतीचे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पुतळ्या,७.५ हजार किमतीचे दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी,५००  नोटा असलेली २० हजार रुपये रोख असा पोलिसी भाषेत ०१ लाख ०८ हजार तर आजचे ११ लाख रुपये असे बाजार मूल्य असलेली रोकड व सोन्याचे दांगीने लंपास केल्याने कोपरगाव तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान गुन्हा दाखल होण्यापूर्वी नगर येथील श्वान पथक दाखल झाले होते त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांना अपेक्षित यश लाभले नाही.

  दरम्यान या प्रकरणी घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी घटनास्थळी भेट  दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी काल रात्री ०९ वाजेच्या सुमारास गुन्हा क्रं.६/२०२३ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close