जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी,पोलिसांचे कौतुक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील काले मळा येथील रहिवासी असलेले व्यापारी रितेश मदनलाल बडजाते (वय-३८) यांच्या नोकराने मालकाच्या घरी विविध सोन्याच्या दागिन्यासह सुमारे १ लाख ३९ हजार रुपयांवर डल्ला मारून पोबारा केला होता.त्या कामी तपास सुरु असताना कोपरगाव शहर पोलिसांना त्यांचा संजयनगर येथील नोकर रुपेश सुनील कोपरे (वय-१९) याचा संशय आल्याने त्याकामी पोलीस अधिकांऱ्यानी त्यास ताब्यात घेऊन आपला हिसका दाखवला असता त्याने विविध ६० हजार रुपयांचा अवैज काढून दिला असल्याची माहिती पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस यांचे कौतुक होत आहे.

  

दरम्यान या घटनेतील संजयनगर आरोपी रुपेश कोपरे यास पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानीं दिली आहे.पोलिस अधिकारी प्रदीप देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या सक्रियतेमुळे शहरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे.मागील महिन्यात दिपावली पाडव्याच्या दिवशी काही हद्दपार गुंडांनी गोळीबार करून पोबारा केला होता.शहर आणि तालुक्यात अन्य अनेक नानाविध गुन्हे वाढले असल्याचे वारंवार सिद्ध होत असून पोलीस अधिकाऱ्यांना आता कडक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते.याबाबत आमच्या ‘न्यूजसेवा’पोर्टलच्या प्रतिनिधीने आवाज उठवला होता.
त्यांनंतर पोलीस अधिकारी सतर्क झाले होते.त्यांनी आपली सक्रियता वाढवली असून हा प्रश्न ऐरणीवर घेतला असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.त्यातील एक आरोपी पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड केला आहे.

   या गुन्ह्यातील फिर्यादीत फिर्यादी रितेश बडजाते यांनी म्हटलं होते की,”आपल्या घरातून विविध सोन्याचे दागिने धरून जवळपास ०१ लाख ३९ हजारांचा डल्ला अज्ञात चोरट्याने मारला होता.त्याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५८७/२०२३ भा.द.वि.कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला होंता.याचा तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करत असताना त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली होती की,त्यातील चोरी हि फिर्यादी यांचा संजयनगर येथील नोकर रुपेश कोपरे यानेच केली आहे.त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांनी त्यास जेरबंद केले असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.मात्र अधिकचा तपास केला असता व पोलिसी हिसका दाखवला असता त्याने आपले तोंड उघडले होते.

  दरम्यान या गुन्हयातील ३० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट,(आजची किंमत जवळपास ०१ लाख १४ हजार) तर तितक्याच वजनाचे सोण्याची साखळी असा एकूण ६० हजार रुपयांचा (आजची किंमत ०२ लाख २८ हजार) ऐवज ताब्यात घेतला आहे.

   दरम्यान या घटनेतील संजयनगर आरोपी रुपेश कोपरे यास पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानीं दिली आहे.पोलिसांच्या या सक्रियतेमुळे या भुरट्या चोरट्यांना आळा बसण्यास मदत मिळणार आहे.त्याचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

   दरम्यान सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,पो.हे.कॉ.बाबासाहेब कोरेकर,पोलीस कॉ.गणेश काकडे,सुशील शिंदे,बाळासाहेब घोंगडे,राम खारतोडे,विलास मासाळ आदींनी महत्वाची भूमिका निभावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close