आंदोलन
संवत्सर येथील आंदोलनास…यांचा पाठींबा

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.त्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुक्यात पाठिंबा मिळत आहे.संवत्सर येथील मराठा समाजातींल नागरिकांनी एकत्र येऊन आपला पाठींबा दिला असताना नुकतीच अड्.योगेश खालकर यांनी समक्ष भेटून आपला पाठींबा दिला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.

“राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मागील वेळेस आपली भूमिका मांडण्यास कमी पडले आहे त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचेसह प्रयत्नशील आहे.आपण मराठा समाजाबरोबर आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष,महानंद,मुंबई.
मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण दि.२५ ऑक्टोबर पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे साखळी उपोषण केले जात असून त्यास नुकतीच कोपरगाव वकील संघाचे सदस्य अड्.योगेश खालकर यांनी आपला घटनास्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
सदर प्रसंगी महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन आपला पाठिंबा देताना सांगितले आहे की,”राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मागील वेळेस आपली भूमिका मांडण्यास कमी पडले आहे त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.आपण मराठा समाजाबरोबर असल्याची ग्वाही दिली आहे.
सदर प्रसंगी संवत्सर येथील मुस्लिम समाज,कहार समाज,कुंभार समाज,मातंग समाज आदींनी सदर आंदोलनास आपला पाठींबा दिला आहे.