अपघात
दुचाकीला अपघात,एक ठार,एक गंभीर जखमी

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील जुना मुंबई-नागपूर महामार्गावर काल रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तळेगाव मळे शिवारात धोत्रे फाट्या नजीक हिरो स्प्लेंडर या दुचाकीस (क्रमांक एम.एच.१७ सी.यू.६५४४) झालेल्या अपघातात नांदूर्खी बू.येथील दुचाकीस्वार आशुतोष विलास बांगर (वय-२१) हा जागीच ठार झाला आहे तर त्याचा साथीदार प्रणव दिलीप चौधरी (वय-१८) हा गंभीर जखमी झाला आहे.

मयत आशुतोष बांगर आणि त्याचा सहकारी प्रणव चौधरी हे कोणालाही काही एक न सांगता वैजापूरकडे गेले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.सदर दुचाकी ही पिकप मालकाची असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यास याबाबत माहिती नसल्याचे आढळून आले आहे.
कोपरगाव तालुक्यातून युती शासनाच्या काळात मुंबई-नागपूर हा नागपूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग ठरला होता.त्याची मधल्या काळात फारच दुरावस्था झाली होती.मात्र दीड वर्षापूर्वी त्याची दुरुस्ती झाल्याने आता त्या मार्गावरून अनेक खाजगी वाहने सुसाट सुटत आहे.समृध्दी महामार्गावर मोठा टोल असल्याने अनेक जण आता या मार्गाला पसंती देत आहे.त्यामुळे या मार्गावरून मोठी वहातूक सुरू असते.त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना दिनाक २१ नोव्हंबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे.त्यातील मयत दुचाकी स्वार आशुतोष बांगर हा आपला नांदूर्खी येथील मित्र प्रणव चौधरी यास घेऊन कोपरगावच्या दिशेने येत असता त्यांचे भरधाव वेगाने दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने सदर दुचाकी हे रस्त्याच्या खोल खड्ड्यात जावून पडली होती त्यात आरोपी मयत आशुतोष बांगर हा जागीच ठार झाला आहे.त्या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी कोपरगाव तालुका पोलिसांना कळवली होती.त्यानुसार त्यांनी त्यास तातडीने उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात भरती केली होती.मात्र त्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे.
दरम्यान चौकशी करून पोलिसांनी सदर मयताची खबर त्यांचे नातेवाईकांच्या घरी कळवली असता त्याचे बरोबर अन्य साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानंतर सकाळी दुसऱ्या इसमाचा शोध घेतला असता तो जखमी अवस्थेत घटनास्थळी साईड गटारीत पडलेला आढळून आला होता.रात्रीची वेळ असल्याने त्याचा शोध लागला नाही अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी त्यास शिर्डी येथे उपचारार्थ दाखल केले असता त्यास शुद्ध नव्हती अशी माहिती हाती आली आहे.तो दुपारी दोननंतर शुद्धीत आल्यानंतर सदर घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांनी तालुका पोलिसांना दिली आहे.दरम्यान त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याने घटनेचा वृत्तान्त दिला आहे.दरम्यान एका माहितीनुसार तो एका आर.ओ.सेंटरचा महिंद्रा पिकपचा चालक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तो आणि त्याचा सहकारी हे कोणालाही काही एक न सांगता वैजापूरकडे गेले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.सदर दुचाकी ही पिकप मालकाची असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यास याबाबत माहिती नसल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुंन्हा क्रं.३७३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१,१२५,(ए),(बी),३२४(४),मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७,प्रमाणे मयत आशुतोष बांगर याचे विरुध्द आपले वाहन हयगईने चालवणे,दुसऱ्याचे मृत्यूस कारणीभूत होणे आदी कलमान्वये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक गवसने हे करत आहेत.