जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

श्री क्षेत्र पोहेगाव ते अंतापूर पायी दिंडीचे आयोजन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पोहेगाव येथील दावल बाबा मंदिर ते सटाणा तालुक्यातील श्री क्षेत्र अंतापूर येथील दावल मालिक बाबा येथील मंदिर या दरम्यान गुरुवार दि.१३ जुलै ते दि.२० जुलै रोजी सालाबादा प्रमाणे पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती पोहेगाव येथील आयोजक ह.भ.प.रमेश औताडे (बाबा) यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले आहे.

उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका शांत गावात जन्मलेले,दावल मलिक बाबा,ज्यांना बाबा साहिब म्हणूनही ओळखले जाते,त्यांच्या उपस्थितीने जगाला कृपा करून गेली आहे.त्यांना मानणारा मोठा वर्ग देशभर पसरला आहे.त्यांचे मंदिर सटाणा तालुक्यातील श्री क्षेत्र अंतापूर या ठिकाणी उंचावरील डोंगरावर प्रस्थापित आहे.त्या ठिकाणी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी भाविकांनी व श्रद्धाळूंची दिवसभर मोठी गर्दी असते.त्यात हिंदू प्रामुख्याने मुस्लिमांचाही समावेश असतो त्या मुळे संत कबिर व साईबाबा प्रमाणे हे दैवत सर्व जाती धर्मासाठी खुले मानले जाते.त्या साठी श्रावण महिन्यात श्री क्षेत्र पोहेगावसह बऱ्याच ठिकाणाहून पायी दिंड्यांचे आयोजन होत असते.

उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका शांत गावात जन्मलेले,दावल मलिक बाबा,ज्यांना बाबा साहिब म्हणूनही ओळखले जाते,त्यांच्या उपस्थितीने जगाला कृपा करून गेली.त्यांच्या जन्माची अचूक तारीख त्यांच्या अनुयायांमध्ये वादाचा विषय आहे,कारण त्यांच्या शिकवणींमध्ये सांसारिक तपशीलांना फारसे महत्त्व नव्हते.तथापि,असे मानले जाते की तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उदयास आला असे मानले जाते.त्यांना मानणारा मोठा वर्ग देशभर पसरला आहे.त्यांचे मंदिर सटाणा तालुक्यातील श्री क्षेत्र अंतापूर या ठिकाणी उंचावरील डोंगरावर प्रस्थापित आहे.त्या ठिकाणी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी भाविकांनी व श्रद्धाळूंची दिवसभर मोठी गर्दी असते.त्यात हिंदू प्रामुख्याने मुस्लिमांचाही समावेश असतो त्या मुळे संत कबिर व साईबाबा प्रमाणे हे दैवत सर्व जाती धर्मासाठी खुले मानले जाते.मात्र मंदिराच्या ठिकाणी हिंदू-मुस्लिम वाद आढळून येतो.त्या साठी श्रावण महिन्यात बऱ्याच ठिकाणाहून पायी दिंड्यांचे आयोजन होत असते अशीच एक दिंडी श्री क्षेत्र पोहेगाव येथून सुमारे ३२ वर्षांपासून सुरु आहे.ती येथील ह.भ.प.रमेश औताडे बाबा यांनी सुरु केली आहे.व अद्याप पर्यंत सुरु आहे.या वर्षी ती गुरुवार दि.१३ जुलै ते दि.२० जुलै रोजी ह.भ,प.रमेश औताडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.त्यासाठी औताडे यांनी संपूर्ण तयारी केली असल्याचे आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.

सदर दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी पादुका पूजन गुरुवार दि.१३ जुलै रोजी सकाळी ०७ वाजता कोपरगाव बेट येथील श्री काशी विश्वनाथ महादेव ट्रस्टचे महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या तर काठी पूजन शारदानंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

सदर दिंडीचा पहिला मुक्काम हा वाकद फाटा बडवर वस्ती ता.निफाड या ठिकाणी तर दुसरा मुक्काम हा टाकळी रोकडे व जाधव मामा वस्ती याठिकाणी तर तिसरा मुक्काम हा बोपाने रोड चांदवड आदिनाथ नगर शेलार वस्ती,याठिकाणी संपन्न होत आहे.तर चौथा मुक्काम हा वाखारी,हनुमान मंदिर ता.देवळा या ठिकाणी संपन्न होत आहे.पाचवा मुक्काम ठेंगोडे,गणपती मंदिराजवळ,सहावा मुक्काम हा साईश्रद्धा लॉन्स वनोली ता.सटाणा,सातवा मुक्काम अंतापूर,’गंगामाय भक्तनिवास’औताडे बाबा आश्रम,शेवरे शिवार,अंतापूर गडाजवळ या ठिकाणी संपन्न होणार आहे.

दरम्यान सदरच्या दिंडीसाठी विविध भाविक आणि विविध गावचे रहिवासी यांचे सहकार्य लाभणार असून ते भोजन व चहा-पाण्याची व्यवस्था करणार आहे.तर येताना भक्तांनी खर्च स्वतः करायचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close