कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास होणार इमारत उपलब्ध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून मिळविलेल्या निधीतून २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या.त्या सर्व प्रक्रिया पूर्ण होवून पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहत इमारतीच्या प्राथमिक स्वरूपातील कामास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दि.०६ एप्रिल २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार हे कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी दोनही इमारतींची झालेली दुरवस्था पाहून निधी देण्याची जाहीर घोषणा करून निधी उपलब्ध करून दिला होता.त्यातून या इमारतीच्या कामास मुहूर्त लाभला आहे.
मागील अनेक वर्षापासून ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न प्रलंबित होता.त्याबाबत निवडून आल्यापासून या दोनही इमारतींसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करीत होतो.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारभार वर्तमान स्थितीत ज्या ठिकाणी सुरु आहे त्याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.तसेच कित्येक वर्षापूर्वी बांधण्यात आलेली पोलीस वसाहत राहण्यासाठी योग्य नसतांना व सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणी येत होत्या.त्याबाबत दि.०६ एप्रिल २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार हे कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी दोनही इमारतींची झालेली दुरवस्था पाहून निधी देण्याची जाहीर घोषणा करून निधी उपलब्ध करून दिला होता.
त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा प्रसिद्ध होवून बुधवार (दि.२१) पासून या दोनही इमारतींच्या नूतनीकरणाच्या प्राथमिक कामास प्रारंभ करण्यात आला आहे.येत्या काही महिन्यात या इमारतींचे काम पूर्ण होवून कोपरगावच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन वास्तू उभ्या राहणार आहेत.या दोनही इमारतींचे लवकरच काम पूर्ण होवून पोलीस कर्मचाऱ्यांना व नागरिकांना लवकरच सर्व सुविधा मिळणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.