गुन्हे विषयक
शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू,कोपरगाव पोलिसांत नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी सोमनाथ महादू घुले (वय-५५) यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मुर्त्यु झाला असून या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी सोमनाथ घुले हे कुंभारी येथील रहिवासी असून त्यांची शेती गावाच्या दक्षिणेस साधारण दोन कि.मी.अंतरावर आहे.त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.त्यांनी आपल्या शेतीसाठी विहीर खोदाईचे काम मजुरांना दिले होते.शनिवार दि.१७ जून रोजी आपल्या विहिरीचे काम पाहण्यासाठी गेले होते असता वाऱ्याच्या झोताने त्यांचा तोल गेला असल्याची माहिती मिळाली आहे.त्या दुर्घटनेत त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कुंभारी येथील रहिवासी असलेले शेतकरी सोमनाथ घुले हे कुंभारी येथील रहिवासी असून त्यांची शेती गावाच्या दक्षिणेस साधारण दोन कि.मी.अंतरावर आहे.त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.त्यांनी आपल्या ग.क्रं.२७९ यातील शेतीत विहीर खोदाईचे काम मजुरांना दिले होते.शनिवार दि.१७ जून रोजी आपल्या विहिरीचे काम पाहण्यासाठी गेले होते असता वाऱ्याच्या झोताने त्यांचा तोल गेला असल्याची माहिती मिळाली आहे.त्या दुर्घटनेत त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.त्यांना तेथील मजूर आणि नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले आहे.दरम्यान या प्रकरणाने कुंभारी,धारणगावसह परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपला वैद्यकीय अहवाल पाठवला असून या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंदी दप्तर क्रं.-४१/२०१३ सी.आर.पी.सी.१८४ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.