साहित्य व संस्कृती
…या कविता संग्रहातून समाज मनाचे दर्शन- प्रा.डॉ.आहिरे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित “पुस्तकावर बोलू काही” चे 213 वे पुष्प या पुस्तकावर बोलू काही जगप्रसिद्ध कवी प्रा.डॉ.आनंद आहिरे यांच्याशी ऐस,पैस गप्पा झाल्या आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत होते.

कवी प्रा.डॉ.आनंद आहिरे हे त्यांच्या आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी संचालक व पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जागतिक कवी व साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ असणारे पुष्परत्न साहित्य समूहाचे अध्यक्ष आहे.तसेच अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत व विश्व मराठी परिषद आजीवन सदस्य आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश पवार व कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर व पदाधिकाऱ्यांनी केले होते.सुरुवातीला जगप्रसिद्ध कवी प्रा.डॉ.आनंद आहिरे यांचा सन्मान मानाची टोपी,शाल व पुस्तक देऊन ज्येष्ठ साहित्यिक मधुकर गिरी यांनी केला आहे.त्यानंतर प्रा.आहिरे यांनी स्वजीवन सांगता सांगता कवितेचा जन्म,त्यांच्या उत्तुंग शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी लिहिलेले विविध पुस्तके,विविध साहित्यिक कार्य,जगायचं राहूनच गेलं या पुस्तकावर प्रकाश टाकला आहे.जगायचं राहूनच गेलं या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या विविध विषयाच्या कविता या समाजाचे वास्तव व्यक्त करतात,जगातला कोणताही माणूस मरण दारात आल्यावर म्हणतो की जगायचं राहूनच गेलं,कवी आनंद आहिरे यांनी पाऊस,आई,तुम्हीच ठरवा,अशा विविध कविता गाऊन रसिका समोर व्यक्त केल्या आहेत.
सन-2022 साली जगायचं राहूनच गेलं या कवितासंग्रहाला गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार प्राप्त झाला असून धुळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ हा ही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.रसिकांमध्ये विशेष उपस्थिती शिक्षक आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक नानासाहेब बोरस्ते,साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थाचालक जोशी सर,ज्येष्ठ कवी माणिकराव गोडसे,तुकाराम ढिकले,कवयित्री अलका दराडे,सुनंदा पाटील,कवयित्री आशा गोवर्धने,ज्येष्ठ साहित्यिक कुलकर्णी,शरद धनराव असे नाशिक मधील प्रसिद्ध विविध कवी,कवयित्री,साहित्यिक,पुष्परत्न साहित्यसमूह व पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश पवार व कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर व पदाधिकाऱ्यांनी केले होते.



