सहकार
सभासद हितासाठी..या साखर कारखान्याची निवडणूक लढविणार-शेतकरी संघटना
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ऊसाचा रास्त भाव आणि सभासदांच्या व कामगारांच्या हितरक्षणासाठी शेतकरी संघटना अशोक कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेऊन सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचा निर्धार नुकत्याच श्रीरामपूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात २०२० मध्ये मुदत संपलेल्या ०१ हजार ९१६ संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यात १५६ स्थांच्या निवडणूकांचा समावेश आहे.या निर्णयानुसार, सहकारी साखर कारखाने,बाजार समित्या,सोसायट्या,पतसंस्था,दूध संघ,सहकारी बँकाच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात २०२० मध्ये मुदत संपलेल्या ०१ हजार ९१६ संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यात १५६ स्थांच्या निवडणूकांचा समावेश आहे.या निर्णयानुसार, सहकारी साखर कारखाने,बाजार समित्या,सोसायट्या,पतसंस्था,दूध संघ,सहकारी बँकाच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.त्यात श्रीरामपुर तालुक्यातील सहकारी कारखानदारीत अग्रणी असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी हा निर्णय जाहीर केला आहे.
या बैठकीस शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅ्ड.अजित काळे,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पठारे,जिल्हा संघटक युवराज जगताप,रूपेंद्र काले,नेवासा तालुका प्रमुख हरिभाऊ तुवर,श्रीरामपूर तालुका प्रमुख अनिल औताडे,युवा आघाडी चे तालुकाध्यक्ष शरद आसने,बबनराव उघडे,बाळासाहेब कदम,डॉ.शंकरराव मुठे,सतिष आसने,सुदामराव आसने,मनोहर मतकर,कैलासराव पवार,बाळासाहेब आसने आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील बेलापूर,पढेगाव,टाकळीभान,गोंडेगाव,उंदिरगाव,वडाळामहादेव,माळवाडगाव,पाचेगाव,पुणतगाव परिसरातील अनेक युवक कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते.अशी माहिती अनिल औताडे यांनी दिली आहे.