सहकार
…या बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात मल्टिस्टेट बँकेत अग्रणी असलेल्या अजिंक्य मल्टिस्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या कोपरगाव शहरातील येवला रोड लगत असलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी ११.४५ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

दरम्यान यावेळी महंत रमेशगिरीजी महाराज,आ.आशुतोष काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,नगराध्यक्ष पराग संधान आदींनी संस्था कार्यालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले असून संस्थेला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उत्तमराव औताडे हे संस्थापक असलेल्या अजिंक्य मल्टिस्टेट संस्थेने अल्पावधीत ठेवी जमा करण्यात मोठा उच्चांक केला असून त्यांच्या मुख्य शाखेचे उद्घाटन आज सकाळी ११.४५ वाजता संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,विजय आढाव,कोपरगाव तालुका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,माजी सभापती रोहिदास होन,अंबादास देवकर,नगरसेवक वैभव गिरमे,अजिंक्य मल्टिस्टेट बँकेचे अध्यक्ष उत्तमराव औताडे,संचालक धनंजय औताडे आदीसह बहुसंख्येने नागरिक,ठेवीदार,कर्जदार,सभासद उपस्थित होते.



