सहकार
…या सेवा संस्थेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर माजी उपाध्यक्षांचा राजीनामा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या रांजणगाव देशमुख येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेश दिघे तर उपाध्यक्षपदी आशा गुडघे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आहे.मात्र सत्ताधारी गटातील एक माजी उपाध्यक्ष तथा संचालक प्रभाकर वर्पे हे नाराज झाले असल्याची माहिती असून त्यांनी आपला राजीनामा दिला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत सत्ताधारी गटाचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक प्रभाकर वर्पे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला असून संस्थेत मनमानी कारभार चालत असल्याने आपण आपला राजीनामा दिला आहे.मात्र आपल्या राजीमाना पत्रात त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण आपला राजीनामा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्याबाबत आपण संस्था प्रशासनाकडून पोहच घेतली असून तो लवकरच मंजूर होईल अशी शक्यता वर्तवली आहे.
राज्य शासनाचा सहकार विभाग ही ग्रामीण व कृषी-औद्योगिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेली अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे.सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्राथमिक कृषी सहकारी सेवा संस्था गावागावात आर्थिक आणि सामाजिक सेवा पुरवून शेतकऱ्यांना बळकटी देण्याचे काम करतात.शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे व पीक कर्ज सुलभतेने उपलब्ध करून देणे.वाजवी दरात खते,बियाणे आणि कीटकनाशके यांचा पुरवठा करणे.आदी कामात या संस्था अहम भूमिका निभावताना दिसून येत आहे.या सेवा संस्थाच्या निवडणुका ग्रामपंचायत पाठोपाठ जिद्दीने लढवल्या जात असल्याचे दिसून येत आहे.अलीकडील काळात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचे आवर्तन केले जाते.परिणामी बहुतांशी कार्यकर्त्यांना त्यात संधी मिळत असते.नुकताच मावळते अध्यक्ष प्रभाकर निवृत्ती वर्पे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते.रिक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे.त्यात अध्यक्षपदी राजेश दिघे तर उपाध्यक्षपदी आशा गुडघे यांची निवड करण्यात आली आहे.मात्र या निवडीतून एक संचालक नाराज झाला असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र यात सत्ताधारी गटाचे माजी अध्यक्ष प्रभाकर वर्पे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे त्याबाबत राजनगाव देशमुख आणि परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदर प्रसंगी प्रकाश गोर्डे,बाळासाहेब गुडघे,अनिल भालकर,सुरेश देशमुख,संपत खालकर,वीरेंद्र वर्पे,बाळासाहेब रणधीर,संतोष वर्पे,हरिभाऊ रहाणे,सुनील रणधीर,सुरेश चव्हाण,अशोक विघे,रामनाथ रहाणे,अजित गुडघे,धनंजय वर्पे,राहुल वर्पे,भाऊसाहेब गुडघे,प्रमोद गुडघे,चंद्रभान खालकर,सोमनाथ वर्पे,भगवान ठोंबरे,राजेंद्र ठोंबरे,संतोष बिडवे,बाळासाहेब बिडवे,रवींद्र खालकर,बाळासाहेब खालकर,सचिन गोर्डे,भाऊसाहेब गोर्डे,भाऊसाहेब रणधीर,संतोष रणधीर,विलास वामन,श्रावण खालकर,आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या निवडीबद्दल संजीवनीचे अध्यक्ष बिपिन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,आ.विवेक कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.मात्र राजीनामा दिलेले उपाध्यक्ष यांनी आ.विवेक कोल्हे यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

याप्रसंगी रांजणगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष राजेश दिघे व उपाध्यक्ष आशा गुडघे यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


