सहकार
सहकारी संस्थांनी आर्थिक शिस्त पाळणे महत्वाचे-आवाहन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त पाळली तरच संस्थेची प्रगती होते हे लक्षात घेवून भविष्यात संस्था चालवाव्या लागतील असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“दरम्यान बँकेकडे १२४ कोटीच्या ठेवी व कर्ज येणे ८० कोटी ४४ लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा २ कोटी ३७ लक्ष झालेला आहे. त्यातून सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून निव्वळ नफा १ कोटी १७ लाख ७८ हजार झाला आहे. तसेच बँकेचा निव्वळ एनपीए ०% आहे. बँकेने अहवाल सालामध्ये येवला व खेडले झुंगे या दोन शाखा नवीन सुरू केल्या आहे”-बापुसाहेब घेमुड,प्रशासकीय अधिकारी,गौतम सहकारी बँक,गौतमनगर.
नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या गौतम सहकारी बँकेची २०२४-२५ या आर्थिक वर्षाची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभ नुकतीच बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण हे होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,संचालक दिलीप बोरनारे,सचिन चांदगुडे,अनिल कदम,सुभाष आभाळे,प्रशांत घुले,मनोज जगझाप,श्रीराम राजेभोसले,श्रावण आसने,डॉ.मच्छिंद्र बर्डे तसेच ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड,विश्वास आहेर,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गौतम सहकारी कुक्कुट पालनचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सोमनाथ चांदगुडे,सुभाष गाडे,सोमनाथ घुमरे शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे,बँकेचे उपाध्यक्ष सुनील डोंगरे,सर्व संचालक मंडळ,व्यवस्थापन मंडळ सदस्य, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे,सेक्रेटरी बाबा सय्यद आदींसह बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गौतम सहकारी बँकेने राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने सर्व डीजीटल सेवा देत आहे या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी बँक स्थापन केल्यापासून या बँकेने अनेक चढउतार पहिले असून बँकेची हि ५० वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि बँक काळानुरूप प्रगतीपथावर आहे.त्यामुळे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हि सभा मोठ्या थाटामाटात सहजपणे घेता आली असती.परंतु आपल्याला माजी खा.शंकरराव काळे यांनी बचतीची शिकवण दिली आहे.त्यामुळे संस्थेचा विस्तार करून संस्थेचे संपूर्णपणे डीजीटलायझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेचा व्यवसाय वाढेल आणि संस्थेची प्रगती होणार आहे.
यावेळी प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले ते म्हणाले की,”बँकेने विविध अडचणीवर मात करून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेचा विस्तार करून एकून नऊ शाखा झाल्या असून दहा वर्षात बँकेच्या ठेवी दुप्पट झाल्या असल्याचे सांगितले.आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये बँकेस ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
यावेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव संचालक व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तीरसे यांनी मांडला.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी विषय पत्रिकेवरील १ ते १६ विषय मांडले त्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय आगवन यांनी मानले आहे.