सहकार
…या सहकारी बँकेस पुरस्कार जाहिर !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेस अ.नगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्यादित,अ.नगर यांचेकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या स्थितीवर बेस्ट परफॉर्मन्स इन एन.पी.ए.मॅनेजमेंट ग्रोथ अँड सर्व्हिसेस व बेस्ट ट्रेनिंग सत्र या वर्गवारी मध्ये दोन पुरस्कार एकाच वेळी देण्यात आले आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.

“आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे सर्व संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी एक जुटीने काम करीत आहे.सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सकारात्मक भावनेतून बँक कामकाज करत असल्याने हा पुरस्कार बँकेला मिळालेला असून हा पुरस्कार सर्वांच्या एकत्रित कामाचा गौरव आहे”- बापूराव जावळे,उपाध्यक्ष,गौतम सहकारी बँक,गौतमनगर.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून बँकेचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे.त्याचबरोबर ऑडिटचा ‘अ’ वर्ग दर्जा राखला असून बँकेने रिझर्व्ह बँकेचे एफ.एस.डबल्यु.एम.चे निकष पूर्ण केले आहे.तसेच बँकेने चालू वर्षात नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात खेडले झुंगे व येवला शहरात नवीन दोन शाखा सुरू केल्या आहेत.बदलत्या काळाबरोबर बँकेने मोबाईल बँकिंगची सुविधा देखील सुरू केली असून लवकरच यू.पी.आय.सेवा ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करणार आहे.त्याचप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे.त्याचबरोबर ठेवीदार,सभासद यांचा विश्वास सांभाळताना एनपीए देखील कमी केला आहे.गौतम बँकेचे ही दोन्ही कामे लक्षवेधी मानली जात असून त्याची नागरी सहकारी बँक असोसिएशनने दखल घेत गौतम बँकेला नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष सत्यन मुदंडा,उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे,मालपाणी उद्योग समुहाचे संचालक राजेशजी मालपाणी यांच्या हस्ते हे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
गौतम सहकारी बँकेला अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दोन पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन बापूराव जावळे यांनी दिली.शिर्डी येथे नुकतेच संपन्न झालेल्या अ.नगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या कार्यक्रमात बँकेला एनपीए कमी राखल्याबद्दल व कर्मचारी प्रशिक्षण या वर्गवारी मद्ये पुरस्कार देण्यात आले आहे.
सदर प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष सत्यन मुदंडा,उपाध्यक्ष व्यवहारे,प्रतिष्ठित उद्योजक राजेश मालपाणी यांच्या हस्ते बँकेचे व्हा.चेअरमन बापूसाहेब जावळे बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड,व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तिरसे,संचालक राजेंद्र ढोमसे,बापूसाहेब वक्ते,रामराव माळी,उत्तम भालेराव,शरद होन आदींसह विविध मान्यवरांनी हा पुरस्कार संयुक्तपणे स्वीकारला.