निवडणूक
लोकसभा,विधानसभा निवडणुका होणार पुढील वर्षी एकत्र होणार !

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुका पुढील वर्षी एकत्र होणार असून नेत्यांनी कामाला लागावे असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी केले आहे.
“भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हाने कोरोनाच्या काळात रेशन किट,अन्न पॅकेट,उत्तर भारतीय नागरिक यांना प्रवासासाठी मदत केली असून व्हर्च्युअल सभेत एक नंबर कामगिरी केली असून,’धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमात पण पहिल्या पाच मध्ये आहे”-राजेंद्र गोंदकर,जिल्हाध्यक्ष,उत्तर नगर.
शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे अध्यक्ष ते खाली संपन्न झाली.यावेळी माजी आ.प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे,माजी आ.चंद्रशेखर कदम,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे,महिला मोर्चा अध्यक्षा सोनाली नाईकवाडी,युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
विजय चौधरी यांनी या बैठकी मध्ये डेटा मॅनेजमेन्ट,सरल अॅप,बूथ सशक्तीकरण,धन्यवाद मोदीजी,फ्रेंड्स ऑफ बीजेपी,सोशल मीडियाचे महत्व,मन की बात,बूथ बैठक के साथ आदी विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
उद्योग आघाडी प्रदेश संयोजक प्रदीप पेशकर यांनी केंद्रीय अर्थ संकल्प यावर मार्गदर्शन केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पुढील पंचवीस वर्षाची दिशा ठरविणारा अर्थ संकल्प मांडला आहे.सहकार बळकटीकरणासाठी उभारी देणारा आहे.शेतकऱ्यांना मदत करणारा आहे असे हि मत व्यक्त केले.
माजी आ.स्नेहलता कोल्हे बोलताना म्हणाल्या कि,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सबलिकरण धोरण राबविले असून आदिवासी महिला राष्ट्रपती केली आहे.
माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी पेट्रोल मध्ये इथेनोल २० टक्के मिश्रणाने शेतकऱ्यांना उसाला भाव भेटेल या बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले असून इथेनोल प्रकल्पाचा हवाई अंतराचे कमी करावे असा ठराव मांडला.
बैठकीचे स्वागत सरचिटणीस सुनील वाणी,प्रास्ताविक जालिंदर वाकचौरे यांनी केले.सूत्रसंचालन सोशल मीडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार सुभाष वहाडणे यांनी मानले आहे.