सहकार
…या संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील सहकारी पतसंस्था चलवळीतील अग्रणी असलेल्या कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन-२०२४ ची दिनदर्शिकेचे प्रकाशन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते मोठया उत्साहात करण्यात आले आहे.दिनदर्शिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते.सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने,आठवड्याचे वार,शुभ वार विविध सुट्ट्या इत्यादी माहिती त्यात दिली जाते.याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिक माहिती दाखवली जाते.अशीच दिनदर्शिका नुकतीच कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर प्रसंगी संस्थेच्या वतीने नव्याने बसवलेल्या सौर प्रकल्पाचे उदघाटनही मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी सहकार विभागाचे निबंधक नामदेव ठोंबळ,ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रविन्द्र बोरावके,सहकार अधिकारी एन.आर.रहाणे,पतसंस्थेचे संचालक मंडळ,संस्थेचे व्यवस्थापक व अन्य अधिकारी,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.