जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

”ऐशी कळवळ्याची जाती,करी लाभा विना प्रीती” वर्तमानात प्रचिती !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यासह अ.नगर जिल्ह्यात आगामी काळात काळात लोकसभा व त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्याने राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांना आता जनतेचे प्रश्न आठवू लागले असल्याचे दिसत असून त्यासाठी आता निळवंडे कालव्यासाठी काही न करता त्याचे जलपूजन,उजनी चारी,गोदावरी कालव्याचे अकरा टि.एम.सी.पाणी,पश्चिम घाटमाध्याचे पाणी दिसू लागले असून त्यांनी आता…’त्या’ पिपाण्या वाजवायला सुरुवात केली असल्याने मतदार संघात चांगलीच करमणूक होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे.

  

निवडणुका जवळ आल्याने निळवंडेच्या पाण्यावर पाईपलाईनचा दरोडा जमला नसल्याने त्यांनी पाझर तलाव व के.टी.वेअर भरण्याचा कळवळा दाखविण्याचे ठरवलेले दिसत आहे.”ऐशा कळवळ्याच्या जाती,करी लाभा विना प्रीती” जिकडे तिकडे दिसू लागल्या आहेत.त्यांना आता कालव्यांची ५३ वर्षांनी उबळ आली असल्याचे दिसत आहे.त्यात लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकताच लोकसभेत निळवंडे पाठोपाठ घाटमाथा प्रश्न मांडल्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

निवडणुका आल्या की आपल्या पिढीजात सवयी प्रमाणे याही वर्षीं नेत्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकात गाजणारे व हमखास मते मिळवून देणारे प्रश्न आवर्जून आठवू लागले आहे.’नेहमीच येतो पावसाळा’ या युक्ती प्रमाणे याही वर्षी याची आठवण मंत्री,खासदार आणि आमदार आदींना येऊ लागली आहे.या संबंधी नुकतीच शिर्डी येथे विश्रामगृह येथे खा.सदाशिव लोखंडे यांना निळवंडे कालव्यांप्रमाणे पश्चिमेचे पाणी जाता-जाता आठवले आहे.


    त्यानी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की,”१०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्यूसेकने पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना त्यात पुंच्छ भागात केवळ ५० क्यूसेकने पाणी पोहचत आहे.त्यामुळे कोपरगाव,राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.त्यामुळे प्रथम नाशिक ‘सिंचन भवन’ येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरणासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गोदावरी उजवा व डावा कालवा कृती समिती व अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार असल्याची माहिती शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकतीच दिली तीच याच पार्श्वभूमीवर मानली पाहिजे.

   वर्तमानात लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले असून त्यांचे प्रतिनिधी सावध होऊन त्यांना मोठा जनतेचा कळवळा येऊ लागला असल्याचे दिसत आहे.शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदार संघ त्यास अपवाद नसल्याचे दिसत आहे.गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागल्याने कोण मतदारांना साखर वाटत असताना दिसत आहे.तर कोणास निळवंडेच्या पाण्यावर पाईपलाईनचा दरोडा जमला नसल्याने त्यांनी पाझर तलाव व के.टी.वेअर भरण्याचा कळवळा दाखविण्याचे ठरवलेले दिसत आहे.”ऐशा कळवळ्याच्या जाती,करी लाभा विना प्रीती” जिकडे तिकडे दिसू लागल्या आहेत.त्यांना आता कालव्यांची ५३ वर्षांनी उबळ आली असल्याचे दिसत आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.त्यात लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकताच लोकसभेत घाटमाथा प्रश्न मांडल्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
त्यांचा नुकताच सत्कार एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी सन्मान आयोजित केला होता यावेळी हि बाब अधोरखीत केली आहे.त्यात त्यांनी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे पाणी पश्चिमेच्या समुद्राला वाहून जाते तेच ११५ टी.एम.सी.पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.या विषयी घाटमाथा प्रकल्पाचे सर्वेक्षण देखील झाले असून मोठा निधी लागणार असल्याचा दावा केला आहे.केंद्र व राज्याच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचा दावा केला आहे.वास्तविक का प्रश्न १९६४ ला प्रथम समोर आला होता.तो निळवंडे पेक्षा जुना मानला जातो.त्याला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी खा.प्रसाद तांपुरे यांनी खरी गती दिली होती व स्वंतत्र प्राधिकरण स्थापन केले होते.मात्र त्यांचे सरकार जाताच वर्तमान त्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसते आहे.

सदर प्रसंगी त्यांनी गोदावरीचा उजवा कालवा हा ११० कि.मी.चा व दावा कालवा ८० किमीचा असून सध्या फक्त यातून १५० क्यूसेकने पाणी येत आहे व ते टेलला फक्त ५० क्यूसेकने पोहचत असल्याचे म्हटलं आहे . आता या कालव्यांची दुरुस्ती होणार असून घाटमाथा पाणी आल्यानंतर गोदावरी.मुळा व प्रवरेला तसेच महत्वाचे म्हणजे निळवंडेची आवर्तन संख्या वाढणार असल्याचा दावा केला आहे मात्र सदर प्रकल्प बारमाही करणार का या विषयी सविस्तर मौन  पाळले आहे.

‘ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभेविण प्रीती।।’ या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे उत्कट प्रेमाची अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्या मुळाशी कळवळा असावाच लागतो.त्याशिवाय निरपेक्ष प्रेम करताच येत नाही.हा कळवळा कोठून निर्माण होतो ? ‘न देखवे डोळा ऐसा हा आकांत। परपिडे चित्त दुःखी होते।।’ असे तुकारामांनीच याचे उत्तर दिले आहे.इतर लोक दुःखी असताना मी कसा काय आनंदी राहू शकतो ? माझे सुख इतरांच्या सुखात समाविष्ट आहे.सभोवतालच्या वेदना पाहून माझे अंतःकरण कळवळते…हा कळवळा निर्माण होण्यासाठी स्वतःच्या स्वयंकेंद्रीवृत्तीतून बाहेर यावे लागते.जगाशी आपलं जगणं जोडावं लागतं.सभोवतालचं ग्राहकीकरणानं झपाटलेलं समाजवास्तव बघितलं,तर मानवी संबंधांमध्ये प्रेमाचे धागे खरंच शिल्लक आहेत काय,याबद्दल शंका यायला लागते.ज्याला आपण प्रेम म्हणतो,ते खरंच प्रेम आहे काय ? असे अनेक प्रश्न पुढ्यात उभे राहतात.याचे उत्तर वर्तमान पुढाऱ्यांना विचारायला हवे आहे.मात्र हि तयारी खरच जनतेतील सुज्ञ नागरिकांची व कार्यकर्त्यांची आहे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close