सहकार
…या संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माजी आ.दादासाहेब शहाजी पा.रोहमारे (पोहेगाव खुर्द) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे.सदर सभेच्या अध्यक्षस्थानी सचिन रोहमारे हे होते.सदर सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“माजी आ.दादासाहेब रोहमारे (पोहेगाव खुर्द ) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात संस्थेच्या सभासदांना १५ टक्क्यांप्रमाणे तर कर्मचाऱ्यांना २० टक्के लाभांश देण्यात येणार आहे”-सचिन रोहमारे,अध्यक्ष,माजी.आ.रोहमारे विविध कार्यकारी सहकारी संस्था,पोहेगाव खुर्द.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,१९६० व नियम, १९६१ मधील कलम ७५(१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे,सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार वर्ष समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी किंवा तत्पूर्वी घेणे राज्याच्या सहकार विभागाने बंधनकारक आहे.त्यामुळे या महिन्यात बहुतांशी सहकारी संस्थाच्या सभा संपन्न होत असतात.कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या माजी आ.दादासाहेब रोहमारे विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झालं आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे हे होते.
सदर प्रसंगी उपाध्यक्ष डॉ.जगदीश झंवर,जेष्ठ संचालक वसंत रोहमारे,संचालक मंडळ सदस्य दिपक रोहमारे,शशिकांत रोहमारे,सतिष जाधव,नवनाथ जाधव,गोरख जाधव,शिवाजी जगताप,संजय रोहमारे,ललिता रोहमारे,अलका रोहमारे,योसेफ भालेराव,भाऊसाहेब सोनवणे,अजय रोहमारे,जयंत रोहमारे,रावसाहेब रोहमारे,द्वारकानाथ होन, मधुकर रोहमारे,नामदेव जाधव,भानुदास रोहमारे,सुनील रोहमारे,मनोहर शेळके,तुकाराम जाधव,राजेंद्र गायकवाड, शुभम रोहमारे,गणीभाई शेख,विजय रोहमारे,दिगंबर चौधरी,अमोल रोहमारे,वसंत औताडे,अण्णासाहेब साबळे,नंदू रोहमारे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष सचिन रोहमारे यांनी माहिती दिली व सभासदांना १५ टक्क्यांप्रमाणे लाभांश वाटप करण्याचे व कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याचे जाहीर केले आहे.त्याचे सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी सोसायटीच्या विषय पत्रिकेचे वाचन सचिव रविंद्र गुजर यांनी केले आहे.संस्थेला चालू आर्थिक वर्षात १४ लाख ९ हजार रुपये इतका नफा झाला असून संस्थेने सभासदांसाठी मोफत विमा उतरविला असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
संस्थेचे २८ लाख ७१ हजार संस्थेचे भाग भांडवल असून २८ लाख १४ हजार इतकी विविध प्रकारची गुंतवणूक केली आहे.मागील वर्षी वाटप केलेले संपूर्ण २ कोटी ६५ लाख रुपयांची कर्ज वसुली झाली असल्याची माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी शेवटी आभार सहसचिव आप्पासाहेब जोंधळे यांनी मानले.वाल्मिक आव्हाळे,रविंद्र भोसले यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे.