सहकार
…हा सहकारी कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ या ६९ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक शिवाजीराव घुले यांच्या हस्ते आज रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे.कारखाना कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून परतीचा पाऊस यावर्षीची पावसाची सरासरी भरून काढेल अशी अपेक्षा आहे.कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मागील वर्षीपासून नवीन बॉयलर व नवीन मिलवर मागील गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून दुसऱ्या टप्यातील बॉयलिंग हाऊसचे काम देखील अंतिम टप्यात असून यावर्षीचा ६९ वा गळीत हंगाम पूर्णपणे नवीन यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.त्यामुळे गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून दरवर्षी करण्यात येणारे मिल रोलर पूजन सोमवार दि.१८ रोजी हरितालिकेच्या मुहूर्तावर संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,संचालक दिलीप बोरनारे,सुधाकर रोहोम,सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे,श्रीराम राजेभोसले,राहुल रोहमारे,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,वसंतराव आभाळे,शंकरराव चव्हाण,श्रावण आसने,गंगाधर औताडे,सुरेश जाधव,विष्णू शिंदे,मिल रोलर पूजन बातमीत पद्मविभूषण डॉ.शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे,प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संतोष शिरसाठ, मुख्यभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायन तज्ञ सुर्यकांत ताकवणे,अर्थ व्यवस्थापक सोमनाथ बोरनारे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे,अध्यक्ष आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,संचालक मंडळ व पदाधिकारी.