समाजकल्याण विभाग
…या गावात दिव्यांग महिलेस दुचाकी भेट !

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग महिला मंगल सूर्यभान देठे यांना दुचाकी प्रदान करण्यात आली आहे.संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यांग सेवांमध्ये दिव्यांग व्यक्तींना केंद्र व राज्य सरकारकडून विविध प्रकारची मदत,योजना आणि संसाधने उपलब्ध आहेत.यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग आणि अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग यांसारख्या सरकारी संस्थांच्या योजनांचा समावेश आहे.यात साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक मदत,स्वयंरोजगारासाठी आर्थिक लाभ (उदा.बीजभांडवल योजना), पुनर्वसन केंद्रे आणि अपंगत्व प्रमाणपत्रावर आधारित योजनांचा लाभ मिळतो.मात्र बऱ्याच वेळा शासकीय योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत असताना दिसत नाही परिणामी हे घटक वंचित रहाताना दिसत आहे.संवत्सर येथे एक दिव्यांग कुटुंब असून सूर्यभान देठे हे त्यांचे नाव.त्यांची पत्नी पायाने दिव्यांग आहे.त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.ही बाब संवत्सर येथील कार्यकर्त्यांनी श्रीराम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती.त्यांनी या कुटुंबाला एक दुचाकी भेट दिली असून त्यांना आता आपले जीवन सुसह्य होणार आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ नामदेव पावडे,उपाध्यक्ष पन्नालाल माधवराव नेहे आदींचे महत्वाचे योगदान लाभले असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी त्यांनी खालील भ्रमण ध्वनी क्रमांक दिला आहे.मो.-8275894285,7821094825.



