सण-उत्सव
कोपरगावात…या विदयालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विदयालय येथे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा येत आहे.आज पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव येथील श्रीमान गोकुलचंदजी विद्यालय येथेही हा उत्साह पाहायला मिळायला आहे.
यावेळी या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संस्थेचे माजी सेक्रेटरी,माजी नगराध्यक्ष आणि थोर स्वातंत्र्य सैनिक कै.जंगुशेठ अजमेरे यांचे प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,राहुल अजमेरे,निवृत्त मुख्याध्यापक सी.आर बजाज,डी.व्ही.तुपसैंदर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी देशभक्तिपर समुह गीत व समुहनृत्य विदयार्थीनी सादर केली.या नंतर विदयार्थीना राजगिरा लाडु वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन.के.बडजाते व एस.डी.गोरे यांनी केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मवारी आदींसह नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.