जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला आहे.ध्वजारोहन कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे यांनी केले आहे.
प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.समता स्कूल येथेही तो उत्साहात संपन्न झाला आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीं समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे हे होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन श्वेता अजमेरे,जेष्ठ संचालक अरविंद पटेल,गुलशन होडे,समता स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाह संदीप कोयटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री युवराज गांगवे यांचा सन्मान समता स्कूलचे संस्थापक कोयटे यांनी केला तर संघटनेच्या इतर माजी सैनिकांचा सन्मान समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद पटेल,श्री गुलशन होडे यांच्या हस्ते समता महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या उत्पादनांचा एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांनी केले प्रमुख पाहुणे आणि प्रमुख उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले.
सदर प्रसंगी समता टायनी टॉट्स मधील शौर्य शर्मा,रैना अगरवाल,स्वराली गोपाळ,पहेल जैन यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व भाषणातून व्यक्त केले.लक्षवेधी विचार व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली.इ.९ वी व इ.१० वी तील विद्यार्थ्यानी तबला,गिटार,पियानोच्या तालावर,”तु मेरा कर्मा,तु मेरा धर्मा” हे गीत सादर केले.यात प्रामुख्याने कुलदीप कोयटे,सिद्धांत जोशी,कामरान अत्तार,निहार गीते,सुजल संचेती,राजहंस आढाव यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.११वी ची विद्यार्थिनी सुचिता पवार व इ.१२ वी तील विद्यार्थी शंतनू होन यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.