सण-उत्सव
पोहेगावात महिला दिन उत्साहात साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे माध्यमिक विद्यालयात नुकताच “जागतिक महिला दिन” विविध उपक्रमांनी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते.पोहेगावातील माध्यमिक विद्यालयातील महिला शिक्षकांचा या वेळी सत्कार करण्यात आला आहे-काकासाहेब गवळी,मुख्याध्यापक.श्री.ग.र.औताडे माध्यमिक विद्यालय.
महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते.महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे,कार्यक्रम निश्चित केले आहेत.ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते.याच परिषदेत जगभरात एक दिवस,”जागतिक महिला दिन” साजरा केला जायला हवा असे ठरविण्यात आले होते.पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता.त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला आहे.या दिनानिमित्त पोहेगावात श्री.ग.र.औताडे माध्यमिक विद्यालयात महिलांसाठी सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब गवळी,पर्यवेक्षक बी.ए.बांगर,कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख के.बी.शिंदे,जेष्ठ शिक्षक,महिला शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विद्यालयातील महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे.प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक काकासाहेब गवळी यांनी केले तर सुत्रसंचलन के.बी.शिंदे यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार श्री बांगर यांनी मानले आहे.