जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

सामान्य बालकांचा मातृभाषेतून शिकणे हा मूलभूत अधिकार-चौधरी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या युनेस्को,युनिसेफ,विकासात सहभागी इतर संस्था,बहुभाषक राष्ट्रांना,शिक्षणात मातृभाषेचाच अवलंब करण्याची जोरदार शिफारस करतात.भाषिक अल्पसंख्याकांच्या बालकांनाही मातृभाषांतूनच शिकवणं ही चैन नसून शैक्षणिक सोयीसवलती मिळण्याचा तो त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील राज्य परिवहन आगाराचे व्यवस्थापक अभिजित चौधरी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत.त्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांनी आपली मातृभाषा शिकताना आणखी भाषा शिकण्याकरिता सुद्धा मातृभाषेवर पुरेसं प्रभुत्व मिळण्याचाही त्यांचा अधिकार आहे”-नानासाहेब जवरे,माजी जिल्हाध्यक्ष,जिल्हा पत्रकार संघ.

कोपरगाव येथे राज्य परिवहन विभागाच्या कोपरगाव आगाराचे कार्यालयात मातृभाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे हे होते.

सदर प्रसंगी कोपरगाव आगाराचे संजय गाडे,सोनाली संगमकर,औदुंबर गाडे,अनिल भाबड,शिवाजीराव भागवत,मिलिंद कोपरे आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”२००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात शांतता,बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आले आहे.२१ फेब्रुवारी १९५२ मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला.त्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांनी आपली मातृभाषा शिकताना आणखी भाषा शिकण्याकरिता सुद्धा मातृभाषेवर पुरेसं प्रभुत्व मिळण्याचाही त्यांचा अधिकार आहे.सारांश राष्ट्रभाषेवर प्रभुत्व मिळवण्याकरिता सुद्धा मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणं हाच राजमार्ग आहे.स्वतःला,राष्ट्राला आणि साऱ्या जगाला मातृभाषेमुळं किती तरी महत्त्वाच्या संधी मिळतात हे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त लक्षात घेऊन आणखीही भाषा शिका.आपल्या भाषांत इतरांना सहभागीही करून घ्या.पण आपापल्या मातृभाषेची महती कधीही विसरू नका.तिची कधीही उपेक्षा करू नका वा अवहेलनाही करू नका असेही ते शेवटी म्हणाले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय गाडे यांनी केले तर उपस्थितांना पत्रकार नानासाहेब जवरे यांनी मार्गदर्शन करताना,”संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी वापरल्या जाणाऱ्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी,प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राजी केले.ठराविक संकल्पनेत,बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.रझाकुल इस्लाम,कॅनडातील व्हॅंकुव्हरमध्ये राहणारी बंगाली या संकल्पनेची सुचना देण्यात आली.त्यांनी ९ जानेवारी १९९८ रोजी कोफी अन्नान यांना पत्र लिहिले की त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित करून जगातील भाषा वाचविण्यापासून एक पाऊल उचलण्यास सांगितले.सारांश राष्ट्रभाषेवर प्रभुत्व मिळवण्याकरिता सुद्धा मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणं हाच राजमार्ग आहे.जगभरात ०६ हजार ५०० तर देशात ०१ हजार ६०० भाषा बोलल्या जातात.त्यापैकी केवळ तीनशे भाषा जास्त वापर होतो.मराठी भाषा हि जगभरात सहावी मोठी भाषा गणली जाते.भाषा हि किमान दीड हजार वर्ष ते अडीच हजार वर्ष वापरात असेल तर तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो या परीक्षेत मराठी कधीच उत्तीर्ण झाली असताना अद्याप केंद्राने तिला २०१४ ला सर्व निकष पूर्ण करूनही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत राज्यातील खासदारांनी दिल्लीत भाजप सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा करायला हवा असे आवाहन त्यानी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी उपस्थितांचे आभार मिलिंद कोपरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close