सण-उत्सव
रामसिंगबाबांचा यात्रा महोत्सव होणार !

न्युजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले रेल्वे नारंदी पुलाजवळ असलेल्या श्री रामसिंगबाबा यांची वार्षिक यात्रा महोत्सव रविवार दि.२७ एप्रिल रोजी आयोजीत केला असून त्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,”संवत्सर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री रामसिंग बाबा यांचा सालाबादा प्रमाणे याही वर्षी,’यात्रा महोत्सव’ रविवार दि.२७ एप्रिल रोजी संपन्न होत असून त्या निमित्ताने सकाळी ०७ वाजता श्रींच्या मूर्तीस गंगा स्नान,सकाळी ०८ वाजता श्री सत्यनारायण पूजा,दुपारी ०४ वाजता निऱ्हाळे येथील ह.भ.प.रेखाताई काकड यांचे हरी कीर्तन संपन्न होणार आहे.

दरम्यान दुपारी ४.३० श्री क्षेत्र कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट होणार आहे.तर त्यानंतर श्री क्षेत्र सरला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट होणार आहे.तर कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे.दरम्यान उपस्थित भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नऊ चारी संवत्सर येथील श्री रामसिंग बाबा भक्त मंडळाने शेवटी केले आहे.