जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यापार

सोयाबीन खरेदी करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा

जनशक्ती न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील शेतकऱ्यांची सोयाबीन व्यापाऱ्याने सोयाबीन विकत घेतली मात्र त्याचे पैसेच दिले नाही म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे अवैध व्यापार करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.


कृषी मालाबाबत व्यापारी आधी शेतकऱ्यांशी गोड-गोड बोलून आधी केलेल्या व्यवहारात रक्कम रोख देऊन विश्वास संपादन करून नंतर शेतकऱ्यांना दगा देतात असे अनेक वेळा घडले आहे.यावर पोलीस महानिरीक्षक श्री. दीघावकार यांनी कडक कारवाईचा इशारा देऊनही अजुनही काही ठग शेतकऱ्यांना फसवत असल्याचे निष्पन्न होत आहे.

याबाबत शेतकरी सागर रावसाहेब पवार (वय २९ धंदा, शेती) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की,”नवल रमणलाल बोरा ( रा.वर्धमान सोसायटी वॉर्ड, नं.७ श्रीरामपूर ) यांनी आपल्याशी जवळीक साधत सोयाबीन खरेदी केले.खरेदीपोटी काही रक्कम दिली व उर्वरीत रकमेची वारंवार मागणी करूनही रक्कम १ लाख ७२ हजार ५०० रुपये न मिळाल्याने त्यांचे।विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे पुढील तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close