कोपरगाव तालुका
नव उद्योजकांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठा उद्योजक संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे यांचे प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथील कार्यक्रमात मराठा उद्योजकांची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांत अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी कोपरगाव येथील संतोष कुटे पाटील यांची निवड झाली आहे.तर अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी कोपरगाव येथील राहुल आढाव यांची तर कोपरगाव येथील डॉ.आदित्य पाटील यांची जिल्हा आरोग्य सचिव पदी निवड झाली आहे.याशिवाय कोपरगावच्या कु.रावीजा पिंगळे यांची अहमदनगर महिला जिल्हा सह संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी,शेती उत्पादनावर प्रक्रिया,कर्ज प्रक्रिया आदी संदर्भात मार्गदर्शन,सहकार्य हे या माध्यमातून करण्यात येणार आहे.यावेळी अहमदनगर जिल्हाअध्यक्ष संतोष कुटे व जिल्हा संपर्क प्रमुख राहुल आढाव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.यावेळी संदीप आहेर उपस्थित होते व या सर्वे नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.नूतन पदाधिकऱ्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले आहे.