जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

कोपरगाव साठवण तलाव निविदेला खो देणारी याचिका खंडपीठाने फेटाळली

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव साठवण तलावाची नुकतीच मंजूर झालेली १३१.२४ कोटींच्या निविदा व पाणी मंजुरीला खो घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी आ.कोल्हे गटाच्या समर्थकांनी दाखल झालेली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्याची माहिती राष्ट्रवादीचे कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगूले व माजी गटनेते विरेन बोरावके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

माजी.आ.कोल्हे गटाने आपल्या धारणगाव,ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव,प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव३.३२ द.ल.घ.मी. पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका कोल्हे गटाच्या समर्थकांनी दाखल केली होती.त्याची सुनावणी होऊन त्याला स्थगिती होत असताना ही बाब निळवंडे कालवा कृती समितीचे वकील अड.अजित काळे यांच्या उशिरा लक्षात आली त्यांनी त्यात हस्तक्षेप केल्याने त्याची दखल न्यायालयाने घेतली आहे.ती फेटाळल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांसह निळवंडे कालवा कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवली होती. तसेच ५ नंबर साठवण तलाव मोठा असल्यामुळे या साठवण तलावासाठी वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविली होती.याच सोबत या ५ क्रंमांकाच्या साठवण तलावाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती.मात्र पडद्यामागून विरोध करणाऱ्या कोल्हे गटाने आपल्या धारणगाव,ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव,प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका कोल्हे गटाच्या समर्थकांनी दाखल केली होती.त्याविरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले व नगरसेवक विरेन बोरावके यांच्या नावे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती.त्याबाबत सोमवार (दि.०२) रोजी सुनावणी होवून दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरून ५ नंबर साठवण तलाव,प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण रद्द करावे ही विरोधकांची मागणी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारे चार साठवण तलाव शहराची तहान भागविण्यासाठी असमर्थ ठरत होते.त्यामुळे मागील अनेक वर्षापासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.याची दखल घेवून आ.काळे यांनी पाणी प्रश्न सोडविण्याची विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १३१.२४ कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळवली होती. त्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.मात्र शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यास आपले पाण्यावर चालणारी दुकानदारी संपुष्टात येण्याच्या भितीपोटी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत माजी आ.कोल्हे गटाने न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.त्या याचिकेवर सुनावणी होवून औरंगाबाद खंडपीठाने या याचिका कर्त्यांनी केलेली मागणी फेटाळली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला आडवे येणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांना न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.याकामी ॲडव्होकेट शाम पाटील,अड. मिलिंद पाटील,अड.व्ही.डी.साळुंके ॲडव्होकेट आर.एल. कुटे,निळवंडे कालवा कृती समितीचे प्रसिद्ध वकील ॲड.अजित काळे व ॲडव्होकेट डी.आर.काळे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close