विशेष दिन
कोपरगावात…या भाजप नेत्याची पुण्यतिथी संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प़ंडीत दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी निमित्त कोपरगावात भाजपच्या वतीने ‘वसंत स्मुर्ती’ कार्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला होता.पं.दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले.साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.शास्त्रे,धर्मग्रंथ,आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला होता.त्यांची ११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती.
पंडित दीनदयाळ उपाध्याय (जन्म : मथुरा,२५ सप्टेंबर इ.स. १९१६,११ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता.भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला होता.पं.दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले.साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.शास्त्रे,धर्मग्रंथ,आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला होता.त्यांची ११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती.मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते.त्यांच्या कार्याबाबत बाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्यात विशेष आदराचे स्थान आहे.त्यांची आज पुण्यतिथी कोपरगावसह देशभर साजरी करण्यात येत आहे.
कोपरगाव येथे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक पी.एम.पाटील यांनी केले आहे.सदर प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष वाल्मिक भोकरे यांनी पंडीतजीच्या कुटुंबातील व त्यांनी केलेल्या त्यागाची सर्व माहिती कार्यकर्त्यांना दिली आहे.
सदर कार्यक्रमासाठी भा.ज.प.’वसंत स्मृती कार्यालय’येथे कोपरगाव शहराचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,नामदेव जाधव,छन्नुजी वैष्णव,राजेंद्र खैरे,माजी नगरसेवक संजय कांबळे,विनीत वाडेकर,प्रकाश सवई,सुरेश कांगुने,बाळासाहेब वाघ,देवीदास कोळपकर,नवनाथ जाधव,कैलास शिनगर,संजय वायखिंडे,अनिल वायखिंडे,किशोर भांगे,उमाताई वहाडणे आदी मान्यवरासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.