जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावातील…या विद्यालयात विदयार्थी आरोग्य तपासणी संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘जागरूक पालक,सदृढ बालक अभियान’ अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच मोठ्या उत्साहत करण्यात आली आहे.

“या अभियाना अंतर्गत सर्व शासकीय शासकीय शाळा,खाजगी शाळा येथिल शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुला मुलींची तपासणी संपन्न झाली आहे.या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भसेवा देण्यात येणार आहे”-डाॕ.सचिन यादव,कोपरगाव.

सदर प्रसंगी डाॕ.जितेंद्र रणदिवे,डाॕ.काजल गलांडे,डाॕ.दीपाली आचार्य,डाॕ.मनिषा बेंद्रे व डाॕ.सपना भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य पथकामार्फत सलग दोन दिवस विदयार्थीची आरोग्य तपासणी करण्यात आली.या तपासणीतून आवश्यकतेनुसार बालकांना आरोग्य केंद्रात मंगळवार आणि शुक्रवारी तसेच ग्रामिण रुग्णालयात शनिवारी तपासणी करीता पाठवण्यात येणार आहे.या सर्व तपासणीत पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास बालकांना जिल्हा रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यामध्ये पाठविण्यात येणार आहे.हे आरोग्य तपासणी अभियान पुढील दोन महिन्यांमध्ये राबविण्याचे आरोग्य तपासणीचे नियोजन असल्याची माहिती वैदयकीय अधिकारी डाॕ.जितेंद्र रणदीवे यांनी दिली आहे.

या वेळी या वैदयकीय पथकांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close