जाहिरात-9423439946
विशेष दिन

वर्तमानात अडवणूक करणाऱ्यापेक्षा सोडवणूक करणारे होण्याची गरज-औटे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमानात अडवणूक करणाऱ्यापेक्षा सोडवणूक करणारे होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकमतचे संपादक संजय औटे यांनी कोपरगाव तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान सदर कार्यक्रम दहा वाजता आयोजित केला असताना तो तब्बल साडे तीन तास उशिराने सुरू झाल्याने आयोजकांना मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते म्हणून हा ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात येतो तो आज कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज दुपारी १.३० वाजता पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.आशुतोष काळे हे होते.

सदर प्रसंगी नगरचे पत्रकार विकास अंत्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्माकांत कुदळे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे,संचालक सुधाकर दंडवते,डॉ.मच्छीन्द्र बर्डे,वसंत आभाळे,शिवाजी घुले,राहुल रोहमारे,प्रवीण शिंदे,सुनील शिंदे,आदि मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”बाळशास्त्री जांभेकर हे विद्रोही पत्रकार आहे.पत्रकारांना ज्या पद्धतीने मांडणी करावी वाटते त्यांनी ती करावी त्यात कोणाचेही दडपण मानू नये,या जिल्ह्यातील वैविध्य आहे.पत्रकार इतरांना जसे देणारे आहे तसे मिळवलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करावी एवढ्या संपत्तीचे मालक आहे.गोवा राज्याची लोकसंख्या इतक्या नगर जिल्ह्याची आहे त्यामूळे मोठे वैविध्य आहे.पत्रकारितेचा वारसा कोणी जपत असेल तर ग्रामीण पत्रकार आहे.हे मी अभिमानाने सांगतो.ग्रामीण विषय जास्त पुरस्कार मिळवून देतात,हे रामनाथ गोयंका पूरस्काराचा अभ्यास करणाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.त्यातील ८० टक्के पुरस्कार हे ग्रामीण पत्रकारांना मिळाले आहे.व १० टक्के पुरस्कार हे शहरातील पत्रकारांनी ग्रामीण भागात जाऊन बातमी मिळवली त्यांना प्राप्त झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.कोरोनाचा प्रसार मुस्लिमांनी केला अशा बातम्या काही माध्यमांनी पेरल्या यातील सत्य बाहेर आणणे गरजेचे आहे.सामाजिक संकेत स्थळाच्या बातम्यांनी आव्हान दिले असले तरी वर्तमान पत्रांच्या बातम्या वाचल्या शिवाय वाचकांचा विश्वास बसत नाही हे विशेष!वर्तमान पत्रांचा खप कमी झाला पण नवीन वर्तमानपत्र चालू होतात हे कशाचे लक्षण आहे.वर्तमान पत्र हे भारतात सर्वात स्वस्त मिळतात.व घरपोच मिळतात.त्या वेळी त्यांनी वर्तमान क्षेत्रांत आलो त्याचे अनुभव विषद केले.भारतात माल वाहतूक टेंमोचा अपघात होऊन वीस जण ठार होतात हा कौतुकाचा व आश्चर्याचा विषय ठरू शकतो.भारत हा खूपच वैविध्याचा देश आहे.जो सामान्यांचा आवाज होतो तीच खरी पत्रकारिता आहे तो ग्रामीण पत्रकाराने  होण्याची गरज आहे.आज अडवणूक करणारे मोठे होत आहे.यावर पत्रकारांनी आवाज उठण्याची गरज आहे.भारत आज ग्रामीण भागात आहे.त्यामुळे बातमीचा विषय हा सामान्य माणूस,शेतकरी,मजूर केंद्रस्थानी असला पाहिजे.शेवटी सुरेश भटांची कविता ऐकवली असून आपले मनोगत संपवले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक आ.आशुतोष काळे यांनी केले तर उपस्थितांना विकास अंत्रे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी स्वर्गवासी पत्रकारांचे स्मरण केले व माजी खा.शंकरराव काळे यांनी पत्रकारांना केलेल्या मदतीचे स्मरण केले व त्यांचे कौतुक केले आहे.ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली नकारात्मक बातम्या वाढल्या असून पत्रकारिता स्थित्यंतरातून जात असल्याचे सांगून यातही सकारात्मकता वाढविण्याचे आवाहन उपस्थित पत्रकारांना केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंदरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close