विशेष दिन
कोपरगावात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सहकारातील अग्रणी असलेल्या
ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त प्रतीमा पुजन करून व त्यांच्या विचाराचे स्मरण करून साजरी करण्यात आली आहे.

जोतीराव गोविंदराव फुले हे देशभरात महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.अस्पृश्यता,जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे कार्य केले होते.त्यांची पुण्यतिथी कोपरगावसह देशभरात मनोभावे साजरी करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड.रवींद्र बोरावके,उपाध्यक्ष देवराम सजन,प्रभाकर पाटील,शेखर भ़ोंगळे,राजेंद्र बोरावके, वाल्मीक भास्कर,मच्छीश्र पठाडे,शिवरकर,पाटणी सर, सरोदे मामा,आदि मान्यवर उपस्थित होते.