जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावातील…या विदयालयांत थ्रीडी आकाशगंगेची सफर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत थ्रीडीआकाशगंगेची सफर
  कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत पोलाद स्टील कंपनी व श्रेयस सिमेंट हाऊस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तारांगण या उपक्रमातून येथील विद्यार्थ्यांना थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशगंगेची सफर घडविण्यात आली आहे.त्याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आकाशगंगा हे सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे,त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे.अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो.हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू,मृग,नौका,वृश्चिक,धनु आणि गरुड या तारकासमूहातून ही आकाशगंगा पसरत गेली आहे.

संबंधित कंपनीने मार्केटिंग बरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्याची भावना जोपासत पोलाद स्टील कंपनी व श्रेयस सिमेंट हाऊस यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां बरोबरच मुख्याध्यापक मकरंद को-हाळळकर,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड व पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते आणि सर्व  शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेतला.

आकाशगंगातील खगोलीय वस्तू,त्याचबरोबर सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास व त्याची माहिती घेताना विद्यार्थ्यांना आपण स्वतः अवकाशात असल्याची आभासी अनुभूती मिळाली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी याबाबतचे अनुभव कथन केले तसेच या माध्यमातून अशाप्रकारे अभ्यास करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी पोलाद कंपनीचे विपणन अधिकारी अजय कुलकर्णी,प्लॕनेटोरीयम आॕपरेटर अभिषेक ढवळे,मदतनीस प्रशांत पंडीत आदींचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे आदींच्या शुभहस्ते करण्यात आला.
               हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close