विशेष दिन
कोपरगावातील…या विदयालयात ‘संविधान दिन’संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्रीमान गो कुलचंद विद्यालयात नुकताच ‘भारतीय संविधान दिन’ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी दिली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन होऊन अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.तो कोपरगाव येथील श्रीमान गोकुलचंद विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.तो कोपरगाव येथील श्रीमान गोकुलचंद विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या प्रसंगी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर पुढे म्हणाले, संविधानाने आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली असुन त्यामुळे देश एकसंघ वाटचाल करत आहे.
सदर प्रसंगी कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे यांनी संविधान दिना निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत.या निमित्तानं शहरातून संविधान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी संविधान प्रतिमेचे पुजन करुन संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.सूत्रसंचलन दीलीप कुडके केले तर आभार श्रीमती उमा रायते यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकांनी परिश्रम घेतले.