विशेष दिन
डॉ.हेडगेवार यांची जयंती…या शहरात उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील नगरपरिषदेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे सांस्कृतिक वार्तापत्र विभागाचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची १३६ वी जयंती त्यांचे प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

डॉ.हेडगेवार यांनी क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली.चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला.डॉ.हेडगेवार हे कुशल संघटक,मार्गदर्शक व नेते होते.
डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म एक एप्रिल १८८९ मध्ये एका गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला.ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत.त्यांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.हेडगेवार लहानपणापासूनच क्रांतीकारी विचाराचे होते.डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली.त्या पायावरच रा.स्व.संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे.क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली.चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला.डॉ.हेडगेवार हे कुशल संघटक,मार्गदर्शक व नेते होते.त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरूजी,बाळासाहेब देवरस,भैय्याजी दाणी,एकनाथजी रानडे,पं. दीनदयाळ उपाध्याय यासारखे नेते,कार्यकर्ते देशाला मिळाले.त्यांची आज जयंती आहे.त्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
या प्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके,सागर बडदे,रविंद्र निकम,सहाय्यक ग्रंथपाल राजेंद्र शेलार,मंगेश वायाळ,गणेश राक्षे आदींसह स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने शताब्दी वर्ष साजरे होत आहे.यानिमित्ताने कुटुंबप्रबोधन,पर्यावरण,सामाजिक समरसता,स्वबोध,नागरी शिष्टाचार यासह विविध विषयांवर कार्यक्रम हाती घेतले जात आहे.
सदर प्रसंगी सागर बडदे यांनी,स्पर्धा परीक्षा,स्वबोध यावर मार्गदर्शन करत डॉ.केशव हेडगेवार यांची माहिती सांगितली आहे तर स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी स्पर्धेत टिकून यशस्वी होण्यासाठी निरंतर प्रयत्न महत्त्वाचे आहे.झाडाला पानगळ होवून नवीन पालवी येते.असा चैत्र पालवीचा ‘वसंतऋतू’ प्रेरणा देतो असे सांगितले.या प्रसंगी विद्यार्थी यांना मनोगत व्यक्त केले तर आभार रविंद्र निकम यांनी मानले आहे.