जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

डॉ.आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व-या नेत्याचे गौरवोद्गार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी दिन-दलितांच्या,शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रगतीची पहाट उगविली होती.त्यांच्या या प्रयत्नाने आज वैभवशाली भारत देश अखंडपणे उभा असल्याचे गौरवोद्गार आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना आ. आशुतोष काळे समाजबांधव व मान्यवर.

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकाळात समता,स्वांतत्र्य,बंधुता,मानवता या मुल्यांची समाजाला शिकवण देवून बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा दिला.अस्पृश्यता निवारण,शेतकरी,महिलांच्या हक्कांसाठी अविरत कार्य केले.हिंदू कोड बिल आणून महिलांना चूल आणि मूल या जोखडातून बाहेर काढले”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ.काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी सकाळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी भन्ते कश्यपजी,युवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मंदार पहाडे,दिनकर खरे,मेहमूद सय्यद,ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी आदिसंह दलित संघटनांचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समाजामध्ये सामाजिक समता,सामाजिक न्याय,सामाजिक प्रतिनिधित्व,यांच्या द्वारे देशाची परिस्थिती मजबूत करणे,जल,विद्युत,उर्जा,कृषी यामध्ये देश संपन्न होईल यासाठी विविध योजना आखणे,नदीजोड प्रकल्प,हिंदु कोड बिलाच्या माध्यमातून महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई,स्वतःच्या ज्ञानाचा फायदा देशासाठी बहाल करून रिझर्व्ह बँकेची स्थापना,एस.सी.,एस.टी.,ओ.बी.सी.यांची माणुस म्हणून ओळख निर्माण करून वेगवेगळ्या क्षेत्रात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अजोड योगदान दिले आहे.वंचितांचे, महिलांचे,कामगारांचे कैवारी तर होते परंतु त्याचबरोबर अर्थतज्ञ,कृषितज्ञ,जलतज्ञ,उद्योगतज्ञ,कायदेतज्ञ,परराष्ट्र धोरणतज्ञ,पत्रकार,लेखक असे त्यांचे अष्टपैलू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी समता,स्वांतत्र्य,बंधुता,मानवता या मुल्यांची समाजाला शिकवण देवून बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा दिला.अस्पृश्यता निवारण,शेतकरी,महिलांच्या हक्कांसाठी अविरत कार्य केले.हिंदू कोड बिल आणून महिलांना चूल आणि मूल या जोखडातून बाहेर काढले.त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली,अधिकार दिले,ओळख दिली.म्हणून आज आपल्या देशातील महिला एवढी प्रगती करू शकल्या आणि करत आहेत.आपला देश प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याचे सर्वांचेच स्वप्न असून हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ.आंबेडकरांची मूल्य जोपासावी लागणार असल्याचे शेवटी आ.काळे यांनी शेवटी आवाहन केले आहे.

   सदर प्रसंगी आ.काळे यांनी कोपरगाव शहरातील गंगाधर फडे चौक,इंदिरापथ व बस स्थानक आदी ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून भारतरत्न त्यांना अभिवादन केले आहे.आज सायंकाळी दलित संघटनांनी मोठी मिरवणूक काढण्याचे ठरवले असून त्यासाठी जय्यद तयारी केली असल्याचे दिसून आले आहे.तर रात्री ०८ वाजता आदर्श शिंदे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम डॉ.आंबेडकर मैदानावर आयोजीत केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close