जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘लव्ह जिहाद’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मारहाण,एकावर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरातील अडत व्यापारी इसम हा आपले हात उसने घेतलेल्या १२ लाख रुपयांपैकी ०६ लाख राहिलेली रक्कम मागण्यासाठी गेला असता ब्रिजलालनगर कोपरगाव येथील आरोपी बाळासाहेब उत्तमराव गाढे याने फिर्यादी तन्वीर मोहंमद हनिफ रंगरेज (वय-४०) यास,”लव्ह जिहाद,बलात्कार,आदी सारख्या खोट्या खटल्यात अडकून टाकील” अशी धमकी देऊन बाजूस पडलेली विट उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ  उडाली आहे.

  

दरम्यान या प्रकरणात फिर्यादी असलेला इसम हा रेशन घोटाळ्यासह कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हयात अडकलेला असून त्याचा शहर पोलिसांत हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस दप्तरी प्रलंबित आहे असे असताना त्याने आरोपी बाळासाहेब गाढे यांचेवर हा गुन्हा दाखल केल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्याबाबत पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात ‘लव्ह जिहाद’ हा जिवंत विषय ठरला असताना व मागील काही वर्षात त्यावर देशभर रणकंदन झालेले असताना कोपरगाव शहरात एक विचित्र घटना उघडकिस आली आहे.यातील फिर्यादी तन्वीर रंगरेज याने आरोपी आरोपी बाळासाहेब गाढे यास सुमारे १२ लाख रुपये हात उसने दिले असल्याचे म्हटले असून त्यातील ०६ लाख रुपये त्याने दिले होते व उर्वरित ०६ लाख रुपयांची रक्कम तो मागण्यासाठी शुक्रवार दि.१२ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आरोपी बाळासाहेब गाढे याचे ब्रिजलालनगर येथील घरासमोर गेला असता आरोपी बाळासाहेब गाढे याने धारणगाव रोड येथील फिर्यादी तन्वीर रंगरेज यास शिवीगाळ करून बाजूस पडलेली विट उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली आहे.व त्यास जखमी करून,”तू; जर मला दिलेले पैसे परत मागितले तर तुला बलात्कार,लव्ह जिहाद,सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकून टाकील” अशी धमकी दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणांनंतर आरोपी घाबरून त्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकारणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व सहा.पो.नीं.मयूर भामरे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

   दरम्यान त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध काल १९१/२०२४ भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस हे.कॉ.के.ए.जाधव हे करत आहेत.

    दरम्यान या प्रकरणात फिर्यादी असलेला इसम हा रेशन घोटाळ्यासह कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हयात अडकलेला असताना व त्याचा शहर पोलिसांत हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस दप्तरी प्रलंबित असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या पार्श्वभूमीवर त्याने आरोपी बाळासाहेब गाढे यांचेवर हा गुन्हा दाखल केल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्याबाबत पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close