निवड
…या ग्रामपंचायतीच्या उपसरंचपदाची निवडणूक संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शहापूर ग्रामपंचायत उपसरपंचपदाची आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अटितटीची निवडणूक संपन्न झाली असून या निवडणुकीत आज आ.काळे गटाच्या सदस्या निशा चंद्रकांत खंडिझोड या बहुमताने विजयी झाल्या आहेत.त्यांचे आ.आशुतोष काळे यांचेसह परिसरातील कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

दरम्यान या निवडणुकीत कोल्हे गटाचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाचौरे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला होता.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे उघड झाले होते.त्यानुसार दोन्ही गटांनी आपापल्या परीने राजकीय जोर लावला होता.मात्र काळे गटास सरपंच योगिता घारे यांचे निर्णायक मत असल्याने काळजी नव्हती.त्या प्रमाणे सदर निवडणूक संपन्न होऊन उपसरपंच पदी निशा खंडिझोड या विजयी झाल्या आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शहापूर ग्रामपंचायतीची निवडणूक सन-2022 मध्ये संपन्न झाली होती.त्यात आ.आशुतोष काळे गटास चार तर माजी आ.कोल्हे गटास चार अशा समसमान जागा मिळाल्या होत्या.त्यात मात्र त्यात लोकनियुक्त सरपंच पद काळे गटास मिळून त्यावर योगिता पोपट घारे यांची निवड झाली होती.दरम्यान उपसरपंच पदी सागर किसन घारे यांना प्रथम संधी मिळाली होती.सदर ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशाने उपसरपंच पदाचे आवर्तन ठरले होते.त्यामुळे दोन वर्षाचे आवर्तन संपल्याने रीतसर उपसरपंच सागर घारे यांनी एक महिन्यापूर्वी सरपंच योगिता घारे यांचेकडे राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती.त्याची निवडणूक निवडणूक अधिकारी सुरेश रहाणे यांनी जाहीर केली होती.त्यासाठी आज शहापूर ग्रामपंचायतीत सभा आयोजित केली होती.

त्यावेळी कोल्हे गटाचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय परशुराम पाचौरे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला होता.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे उघड झाले होते.त्यानुसार सकाळी अर्ज सादर झाल्यानंतर दोन्ही गटांनी आपापल्या परीने राजकीय जोर लावला होता.मात्र काळे गटास सरपंच योगिता घारे यांचे निर्णायक मत असल्याने काळजी नव्हती.त्या प्रमाणे सदर निवडणूक संपन्न झाली असून त्यात अपेक्षेप्रमाणे काळे गटाचे सदस्या निशा चंद्रकांत खंदिझोड यांची निवड बहुमताने झाली आहे.
सदर प्रसंगी सरपंच योगिता घारे,माजी उपसरपंच सागर घारे,कविता अंकुश घारे आदींसह कोल्हे गटाचे सदस्य सागर घारे,निर्मला भाऊसाहेब घारे,दत्तात्रय पाचोरे,सविता बाबासाहेब पाचोरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ग्रामविकास अधिकारी सुरेश रहाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका निभावली आहे.
दरम्यान या निवडीचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे,ज्येष्ठ नेते रामनाथ घारे,नंदकिशोर औताडे,राजेंद्र पाचोरे,विकास पाचोरे,अशोक डांगे,जनार्दन पाचोरे,रमेश डांगे,चंद्रकांत खंडीझोड,पोलिस पाटील दामोधर खंडीझोड,पोपट घारे,ग्रामपंचायत सदस्य कविता घारे,सागर किसन घारे,वाल्मिक खंडीझोड,पोलीस विभागाचे प्रसाद गोरे,आकाश चव्हाण,निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश रहाणे आदीनी अभिनंदन केले आहे.