विशेष दिन
कोपरगाव शहरात पत्रकार दिन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पत्रकारांना मिळणारा पगार,सुटट्या,कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सोयीसुविधा हे नीट असेल तर सत्तर टक्के पत्रकार चांगलं काम करतील.परंतु दुर्देवाने तसं होत नाही.पत्रकारांना घर चालवायचं असतं.पोलिसांची आणि पत्रकारांची वेळे बाबत तीच स्थिती असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी नुकतेच केले आहे.
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता.त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने काल दि.०६ जानेवारी रोजी सायंकाळी ०७ वाजता रेझिंग डे’ व ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात एकत्र संपन्न केला आहे.त्यानिमित्त पत्रकार दिनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना,सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी,यासाठी ‘भेट पोलिस स्टेशनला’ हा उपक्रम नुकताच जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे.यात जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलिस ठाण्यांना भेट आयोजित केल्या आहेत.त्यांना पोलिस खात्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात येत आहे.त्याचबरोबर पोलिसांकडील शस्त्रसाठ्याचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
तर दि.०६ जानेवारी रोजी दर्पणकार यांनी आपला दर्पण हा अंक प्रसिद्ध केल्याने हा दिवस,’मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’पासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे.लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग,वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे,समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.दरम्यान कोपरगाव शहर पोलीस व तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकारांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी नुकताच,’पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी शिर्डी पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहायक पोलिस निरीक्षक विकास वाघ,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,शहर आणि तालुक्यातील पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सुरुवातीला प्रिंट माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आव्हान होतं.पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आगमनानंतर वर्तमानपत्रांनी स्वतःला बदललं.पण आता डिजिटल मीडिया,सोशल मीडिया वेगानं वाढत आहे.प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे.त्यामुळे छापून वर्तमानपत्रं छापन आणि विकणं कठीण झालं आहे.त्यामुळे सध्याच्या काळात प्रिंट मीडियाचं भविष्य हे फारसं आशादायक नसल्याचं त्यांनी शेवटी सांगितले आहे.समाजातील शांतता कामकाजाबाबत पोलीस आणि पत्रकार यांचे काम सारखे असल्याचे सांगून दोघे समाजात शांतता नांदण्यासाठी कार्यरत असल्याचे शेवटी सांगीतले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन स्वच्छता दूत सुशांत घोडके,तर उपस्थितांचे आभार रोहिदास ठोंबरे यांनी मानले आहे.