न्यूजसेवा
लोहगाव( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव परिसरात परिसरात बिबट्याने घातले थैमान घातले असल्याने शेतकरी व ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोहगाव येथील एरिकेशन चौकी जवळस लागून असलेल्या अशोक लांडगे यांच्या घराजवळ रात्री अकराच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार पाहण्यास मिळाला.गेल्या तीन दिवसांपासून हा बिबट्या रोज येत आहे,रात्री तर त्याने एका गाईजवळ दहा मिनिटे मुक्काम ठोकला होता,त्या वेळेस लांडगे यांचा मुलगा महेश याने जवळील मुलांना फोन करून बिबट्या विषय माहीती दिली,त्या वेळेस,जवळच्या वस्तीवरील मुले,मोठया संख्येने धाऊन आले त्यांनी फटाके वाजवून,टेंभे,गाडीचा हॉर्न वाजवून बिबट्याला पळून लावले,या वेळेस रंजित इनामके,पंकज भालेराव,रोहित डांगे,विशाल भिवसने,अक्षय इनामके,अनिकेत मोरे,प्रशांत डांगे,सागर वाडगे,राज जगदाळे आदी युवक हजर होते.या मुळे मोठा अनर्थ टळला आहे. बिबट्याला पळून लावण्यात यश आले आहे.या वेळी लोहगावचे माजी सरपंच गणेश चेचरे स्वतः उपस्थित होते.सदर घटना व घडलेला प्रकार युवकांनी लोहगावचे पोलीस पाटील वसंतराव चेचरे यांना सांगितला या मुळे लोहगाव परिसरात एरिकेशन चौकी,टेकावडे वस्ती,इनामके वस्ती,चेचरे वस्ती,येथे भीतीचे वातावरण आहे.तरी सदर बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.