जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

जाहिरात संहितेचे उल्लंघन…इतक्या लोकांवर गुन्हे

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   विविध दूरचित्र वाहिन्यावरून बंदी असलेल्या जाहिराती प्रसारित केल्यावरून गेल्या ३ वर्षात एकूण ४९२ लोकांवर जाहिरात संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्यची माहिती लोकसभेत प्रसारण माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

  

“वर्तमानात देशात आणि राज्यात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.हा विषय मोठा संवेदनशील बनला आहे.त्यातून अनेकांची प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत.दरम्यान जाहिरातीत दोन ते चौदा वर्षां खालील तरुणांना दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि जाहिराती यांच्यात फरक करता येत नाही; त्यामुळे यावर आवर घालणे गरजेचे बनले आहे;त्यामुळे हा प्रश्न  आपण उपस्थित केला आहे”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी.

  मुलांवर विविध प्रकारे जाहिरातींचा प्रभाव पडू शकतो आणि ते त्यास कसे प्रतिसाद देतात हे त्यांचे वय, पार्श्वभूमी ज्ञान आणि अनुभवाच्या पातळीसह अनेक घटकांवर अवलंबून असते.वर्तमानात देशात आणि राज्यात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.हा विषय मोठा संवेदनशील बनला आहे.त्यातून अनेकांची प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत.दरम्यान जाहिरातीत दोन वर्षांखालील तरुणांना दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि जाहिराती यांच्यात फरक करता येत नाही; तथापि,तीन ते सहा वयोगटातील मुले करू शकतात.०७ ते ११ वयोगटातील मुले हे समजू शकतात की त्यांना काहीतरी विकले जात आहे.विक्रीचे डावपेच ओळखू शकतात आणि खराब विक्री गुणांसह वस्तू खरेदी करण्यास इच्छुक आहेत,म्हणून ते काय विकले जात आहेत हे देखील समजू शकत नाहीत.१२ ते १३ वयोगटातील किशोरवयीन सामान्यत: त्यांना काय विकले जात आहे हे समजू शकतात आणि त्यांना जे सांगितले गेले त्या आधारावर ते खरेदी करायचे की नाही हे ठरवू शकतात.तथापि,ते अवघड प्लेसमेंटसह उत्पादने ओळखू शकत नाहीत किंवा एखाद्या उत्पादनास मान्यता देण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे दिले जात आहेत हे समजू शकत नाही.१४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये योग्य खरेदी करण्यासाठी आवश्यक निर्णय क्षमता असू शकत नाही आणि मार्केट कसे चालते हे समजू शकत नाही.त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम त्यांच्यावर होण्याची शक्यता असते.त्यामुळे खा.वाकचौरे यांनी हा महत्वाचा प्रश्न संसदेत नुकताच उपस्थित केला आहे.

     सदर प्रसंगी त्यांनी पुढे म्हंटले आहे की,”गेल्या तीन वर्षात सिगारेट,तंबाखू आणि दारूच्या जाहिराती केल्या जात आहेत.याबाबत बंदी बाबत काही निवेदने शासनास प्राप्त झालेले आहेत काय ? त्यावर केंद्रीय प्रसारण मंत्री यांनी हेवी सँटेलाइट टीव्ही,चँनेलवर दिसणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी दुसंचार नेटवर्क (नियमन ) कायदा-१९९५ आणि त्याखाली नियम बनविलेले असुन  त्यात कोणत्याही जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिगारेट,तबाखू,उत्पादन,मद्य व मादक पदार्थ यांच्या उत्पादनास विक्री किंवा वापरण्याबाबत प्रोत्साहित करणेची परवानगी नाही कार्यक्रम आणि जाहिराती भारतीच्या प्रोग्राम कोड आणि जाहिरात कोडनुसार प्रकाशित केल्या जातात.तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आली असून  त्याद्वारे प्राप्त ताक्रीरीचे निवारण करण्यात येते असे शेवटी स्पष्ट केले आहे.

   दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी तरुणांशी संबंधित हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केल्याने त्याचे शिर्डी लोकसभा मतदार संघात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close