कोपरगाव तालुका
संवत्सर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. प्रारंभी संवत्सर गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. प्रतिमेस गंगास्नान घातल्यानंतर शृंगेश्वर पतसंस्थेच्या कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, भरतराव बोरणारे, शिवाजीराव गायकवाड, चंद्रकांत लोखंडे, अविनाश गायकवाड, लक्ष्मणराव परजणे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर गावातील महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयात पंडितराव भारूड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमनाथ निरगुडे, पंडितराव भारुड, बापू तिरमखे यांनी प्रतिमेचे पूजन केले. सायंकाळी हनुमान मंदिराच्या प्रांगणात गंगागिरी महाराज महाविद्यालयाचे प्रा. सुरेश काळे, महर्षी विद्या मंदिराचे प्रा. तुवर यांची व्याख्याने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संवत्सरचे माजी उपसरपंच विवेक परजणे हे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनीही कार्यक्रम प्रसंगी भेटी देऊन शिवरायांना अभिवादन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खर्डे, किरण शेटे, प्रितेश वरगुडे, सचिन वरगुडे, बंटी गायकवाड, अमित गायकवाड, सचिन गायकवाड, एकनाथ चाळक, बाबासाहेब भोसले, प्रवीण रोहम, अभिजीत कासार, यांनी परिश्रम घेतले. लक्ष्मणवाडी येथील कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.