जाहिरात-9423439946
राज्य विधीमंडळ कामकाज

अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई करा…या आमदारांची अधिवेशनात मागणी!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैध गौण खनिजाचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.यामुळे मतदारसंघातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून माती,वाळू आणि मुरूमाची अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चे दरम्यान करून या प्रश्न राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अवैध वाळू उत्खनन या विषयावर लक्षवेध करताना आ.आशुतोष काळे.

  

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या प्रश्नाने तर नेते आणि प्रशासनाच्या डोक्यावरून पाणी फिरले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे हे अलीकडील काळात सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत आहे.मात्र तरीही प्रशासन जागचे हलायला तयार असल्याचे दिसत नाही.त्यामुळे संतप्त होऊन आ.काळे यांनी या प्रश्नावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर आवाज उठवला असल्याचे दिसून येत आहे.

   कोपरगाव तालुक्यातील गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत असताना दिसत आहे.त्यामुळे सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे.अवैध वाळू उपशाच्या प्रश्नाने तर नेते आणि प्रशासनाच्या डोक्यावरून पाणी फिरले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे हे अलीकडील काळात सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत आहे.मात्र तरीही प्रशासन जागचे हलायला तयार असल्याचे दिसत नाही.त्यामुळे संतप्त होऊन आ.काळे यांनी या प्रश्नावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर आवाज उठवला असल्याचे दिसून येत आहे.
त्यात त्यांनी कोपरगाव मतदारसंघातील अवैधपणे गौण खनिजाच्या होत असलेल्या उपशाकडे सभागुहाचे लक्ष वेधतांना सांगितले की,”कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असून ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचे उत्खनन सुरू आहे.परिणामी भूजल पातळी खोलवर गेली आहे.हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही तर यातून मिळणाऱ्या अवैध पैशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना वावर वाढत आहे.या पैशांच्या बळावर हे माफिया दहशत निर्माण करीत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा यासाठी महसूल विभाग,पोलीस प्रशासन आणि संबंधित कार्यालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाला वाळू उपसा बंद करण्यात अपयश येवून महसूल आणि पोलीस प्रशासनाला न जुमानता गौण खनिजाचा उपसा सुरूच आहे.

सुरेगाव हद्दीत गोदावरी नदीपात्रात आजही सुरू असलेला अवैध वाळू उपसा दिसत आहे त्याचे छायाचित्र.

गौण खनिज सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.केवळ महसूल विभाग या माफियांचा बीमोड करू शकत नाही.महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा कारवाई करतांना पोलिसांची मदत लागते.यामुळे महसूल विभागाला पोलीस प्रशासनाच्या भक्कम पाठबळाची गरज आहे.मात्र ते आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात धन्यता मानत आहे.जर पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली तर ही कारवाई अधिक गतीने आणि प्रभावीपणे होऊ शकेल.जोपर्यंत पोलीस बळ या कारवाईत पूर्ण ताकदीने उतरत नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज उपसा कायमस्वरूपी थांबणार नाही असा त्यांनी दावा केला आहे.त्यामुळे गृह विभाग आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करून अवैध अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांना कायमचा लगाम घालावा अशी मागणी आ.काळे यांनी विधिमंडळात शेवटी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close