महिला बालविकास विभाग
कोपरगाव तालुक्यातील…या गावात शालेय पोषण आहार वाटप संपन्न
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत नुकताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत,’शालेय पोषण आहार अभियान’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी.च्या शाळा फेब्रुवारीत सुरु करण्यात आल्यानंतर कोरोना साथ आटोक्यात आल्या नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय,खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील पात्र शाळातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार गावागावातील शाळांत हा निर्णय राबविण्याचा उपक्रम सुरु आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत अपवाद नाही.येथेही नुकताच हा उपक्रम घेण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील बालविकास प्रकल्प अधिकारी जे.डी.वाघेरे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,प्रभारी गट शिक्षणाधिकारी शबाना शेख,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पठाण,महिला समुदेशक झाल्ट मॅडम,सहाय्यक गटविकास अधिकारी साबळे,ग्रामविकास अधिकारी के.ए.अहिरे,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा सेविका,परीसरातील महिला,किशोरवयीन मुली आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती खोले मॅडम यांनी केले तर उपस्थितांना वाघेरे यांनी मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी अहिरे यांनी मानले आहे.