निधन वार्ता
महंत अरविंदगिरीजी महाराज अनंतात विलीन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दत्त पार येथील बाल ब्रम्हचारी तपस्वी संत अरविंद महाराज यांचे काल एकादशीच्या दिवशी वयाच्या ८५ वर्षी महानिर्वाण झाले होते.त्यांच्यावर आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरीत बाजारतळ लक्ष्मी माता मंदिरांच्या प्रांगणात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मुखाग्नी दिला आहे.

महंत अरविंदगिरीजी महाराज हे कोपरगाव येथे १९७२च्या सुमारास दत्त पार येथे आगमन करून या ठिकाणी आपले संपूर्ण जीवन कीर्तन प्रवचन आदी मार्फत धार्मिक व सामाजिक कार्यात व्यतीत केले होते.आपल्या हयातीत ‘शिवपुराण’ या ग्रंथाचे लेखन केले होते.त्यांच्या निर्वाणाने त्यांच्या भक्तात शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर साधू संतांच्या उपस्थितीत दुपारी ०१ वाजेच्या सुमारास गोदावरीतिरी त्र्यंबकेश्वर येथील ब्रहंवृंदाच्या मंत्रोपचाराच्या सहाय्याने धार्मिक संस्कार करून मुखाग्नी देण्यात आला आहे.त्यांना मानणारा मोठा भक्तपरिवार कोपरगाव,राहाता,येवला आदी परिसरात आहे.त्यांनी महाराष्ट्रात पायी तीर्थाटन मोठ्या प्रमाणावर केले होते.

सदर प्रसंगी काशिकानंद महाराज यांनी महंत अरविंदगिरीजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन धार्मीक कार्याचा आढावा घेतला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक शांताराम गोसावी यांनी शहराच्या वतीने श्रद्धांजली वाहिली असून महंत अरविंदगिरीजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
सदर प्रसंगी कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज,अंजनापूर येथील महंत रामप्रभु महाराज,भागवताचार्य ह.भ.प.उकिरडे महाराज,मुक्तांनद महाराज,शिर्डी येथील काशिकानंद महाराज,कुंभारी येथील राघवेश्वरानंद महाराज,चाळीसगाव येथील बापूगिरीजी महाराज,संजीवनीचे उपाध्यक्ष घोडेराव,डॉ.तुषार गलांडे,माजी नगरसेवक संजय जगताप,मुंबादेवी मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष चव्हाण,भाजपचे पराग संधान,बाळ शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदार दडीयाल,माजी नगरसेवक स्वप्नील निखाडे,आदींसह मोठ्या संख्येने महिला भक्त व भाविक उपस्थित होते.